रावेर – रावेर तालुक्यातील पुवभागासह आज संध्याकाळी अवकाळी पावसाने चांगले झोडपले त्यामुळे परिसरातील नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आज संध्याकाळी रावेर येथे आठवडे बाजारात सह तालुक्यातील काही
भागात अवकाळी पावसने वाऱ्यासह हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ झाली तसेच पावसामुळे शेतकराच्या हरभरा गहू टरबूज या पिकांचे काही प्रमाणात नुकसान होण्याची पण शक्यता आहे.तालुक्याती
ल वाघोड गावात काही सेकंद पावसा सह गार पडल्याचे चित्र आहे तसेच बुऱ्हाण पूर अंकलेश्वर रोडवरील कर्जोद जवळ भोकर . चे वाळलेले झाड पडल्याने काही वेळ वाहतूक ठप्प होती.वाघोड येथील हायस्कूल चे शिक्षक संदीप
लाडसर,तसेच ग्रामस्थ योगेश चौधरी, नरेंद्र गाढे,अतुल विचुलकर,कमलेश पाटील यांनी रस्ता पडलेल्या झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात मदत करण्यात आली
Discussion about this post