महागाव तालुका प्रतिनिधी गजानन कदम
महाराष्ट्र सरकार आता मध्य विक्रीचे परवाने अधिक देणार असल्याचे राजकीय नेत्यांकडून बोलल्या जाते पण आपण आज रोजी समाजा मध्ये पाहतो ग्रामीण भागामध्ये विशेष करून देशी दारूचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात होत आहे देशी दारूच्या नादाला लागून गोरगरिबांचे संसार धुळीस मिळाले आहे दारू
पायी बऱ्याच लोकांच्या जमीन जुमला सुद्धा मोठ्या प्रमाणावर दारूच्या नादाला लागून त्यांचे लेकरं बाळ भूमिहीन झाल्याचं पहावयास मिळते आहे नव्हे तर कित्येकांच्या दारूमुळे बायका सुद्धा नवऱ्याला सोडून गेल्या च्या घटना या समाजात आपल्याला पाहायला मिळतात महागाव तालुक्यामधील
हिवरा येथे विधवेचे प्रमाण सुद्धा याच दारूपायी वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे कारण ज्यांचे वय मरायचे नसून सुद्धा दारूमुळे त्यांना लवकरच मरण पत्करावे लागले आहे असे बरेच लोक पहावयास मिळतात याला कारणच दारू पिण्याचे प्रमाण वाढल्यामुळे दारूमुळे लवकरच आयुष्यातून उठावे लागत
असल्याने बऱ्याच विवाहित महिला दारू या व्यसनामुळे विधवा झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे आणि आता तर सरकार एकीकडे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देतय आणि आता सरकार मध्य विक्रेचे परवाने वाढविण्याच्या चर्चा असल्यामुळे सुज्ञ नागरिक हा चिंतेत असल्याचे पहावयास मिळत आहे कारण आज रोजी तर युवकांच्या आधीच हाताला काम नाही
थोडेफार जे कमावतायेत तेही जर त्यांनी दारू या व्यसनामध्ये घातले तर त्यांच्या कुटुंबीयांचं काय होणार हा प्रश्न लाडक्या बहिणीला सतावत आहे खेडेगावांमध्ये जे देशी दारूचे दुकाने आहेत त्यापैकी बऱ्याच गावांमध्ये देशी दारू दुकान बंद करण्याच्या मागण्या महिलांकडून झाल्या आहे आपल्याला पाहायला किंवा ऐकायला मिळते म्हणजेच सरकारला माणसापेक्षा मध्यविक्रीपासून होणाऱ्या करप्राप्तीला अधिक महत्त्व आहे का ?
असा प्रश्न लाडक्या बहिणींसह सुज्ञ नागरिकांना पडला आहे आधीच व्यसनापाही घराघरात लोक परेशान आहेत आणि यामध्ये जर अधिक आता मध्यप्रवाने देण्यात आले तर दारू पिणाऱ्यांचे प्रमाण किती वाढणार आणि या वाढलेल्या प्रमाणाचा समाजावर काय परिणाम होणार या गोष्टीचा विचार करावा लागेल समाजातील नवयुवक व नागरिक यांच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे मध्यापासून सरकारला करप्राप्ती हे आहे काय कर मिळण्याचे भरपूर ठिकाणी आहेत मध्यापासूनच कराची गरज आहे का?
किराणा दुकान- कापड दुकान सोन्या-चांदीचे दुकान किंवा भुसार मार्केट यापासून सुद्धा करप्राप्ती होते पण योग्य प्रमाणात कर हे लोक भरत नसल्याने किंवा योग्य प्रमाणात या कराची वसुली होत नसल्याने पळवाटा काढून हे लोक सरकारचा कर लपवीत असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये आहे जर प्रत्येक किराणा दुकानदार भुसार व्यापारी व प्रत्येक
व्यापाऱ्याकडून सरकारने योग्य पद्धतीने कर वसुली करावी कोणालाही कर चोरी देऊ नये आज बऱ्याच व्यापाऱ्यांकडून सरकारी कराची चोरी केल्या जाते असं समाजामध्ये बोलल्या जाते नव्हे कधी कधी हे चित्रही पाहायला मिळते जसे कृषी उत्पन्न बाजार समिती भरपूर प्रमाणात व्यापाऱ्यांच्या गाड्यांच्या भरून विक्री केल्या जातात पण त्या सर्व गाड्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समिती योग्य पद्धतीने पावत्या फाडत नसल्याचे बोलल्या जाते नव्हे तर कापूस तीळ व ज्यांना अधिकचा
कर लागतो अशा गाड्यांच्या पावत्या सोयाबीन किंवा ज्वारीच्या नावावर फाडल्या जातात असेही नागरिकांमधून बोलल्या जाते जर सरकारला कर वसुली करायची असेल तर मग जे लोक कराची चोरी करतात त्यांच्याकडून कर योग्य पद्धतीने भरून का ? घेत नाहीत त्यासाठी मध्य विक्रीचे परवाने देणे आवश्यक आहे काय मध्य विक्रीच्या असलेल्या पहिल्याच परवान्यामुळे समाज
कोडमोडीला आलेला आहे मग अधिक जर मध्य विक्रीचे दुकाने वाढविण्यात आली तर याचा परिणाम नवयुवकांवर व नागरिकांवर काय होणार याही गोष्टीचा विचार सरकारने करून मध्य विक्रीचे परवाने देऊ नयेत अशा चर्चा सुद्धा लाडक्या बहिणीमधून चर्चेला उदान आलेले दिसत आहे कर महत्त्वाचा समाजातील माणूस महत्त्वाचा आहे यामध्ये आता कोण महत्त्वाचं
असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच व्यापाऱ्यांकडून आपल्याला कच्चाबिलावरच व्यापारी माल विक्री करताना दिसतात म्हणजेच ते कर लोपवितं आहेत का ?असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो जसे किराणा दुकानातून किराणा सामान घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचं बिल दिल्या जात नाही किंवा शेतकऱ्याचा माल भुसार व्यापाऱ्याला विकल्यानंतर तो पक्की बिल शेतकऱ्याला देत नाही याचा अर्थ काय
मग सरकारने या बाबीकडे लक्ष देण्याची गरज असल्याची लाडक्या बहिणी व सुज्ञ नागरिकाकडून बोलल्या जात आहे समाजामध्ये मध्य विक्रीचे परवाने वाढल्यास याचा सर्वात मोठा फटका हा लाडक्या बहिणींना बसेल आणि समाजातील नवयुवक वर्ग हा अधिक व्यसनाधीन होण्याची शक्यता नाकारता
येत नाही त्याकरिता राज्यामध्ये मध्य विक्रीचे प्रमाणे अधिकचे वाढविले जाऊ नये अशी मागणी ग्रामीण भागात ती लाडक्या बहिणीकडून तोंडी केली जात आहे
Discussion about this post