.मारेगाव :शेतामधून घरी परतत असताना रस्त्यात अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील केगाव (गोधणी) येथे घडली.ही घटना आज दि. 27 डिसेंबर 2024 रोज शुक्रवारला सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली.विजेने मृत्यू झालेल्या महिलेचे
नाव सौ.मेघा गणपत पानघाटे वय अंदाजे 45 वर्ष रा.केगाव असे आहे.केगाव येथील गणपत पानघाटे यांचे कडे 4 एकर शेती आहे व काही शेती त्यांनी ठेक्याने गोधनी शिवारात केलेली होती.त्यांची पत्नी आज शेतामध्ये कापूस वेचण्याकरिता एका महिले सह गोधनी शेत शिवारात गेली होती.
शेतामधून घरी परतत असताना रस्त्यात असलेल्या डाखरे यांच्या शेताजवळ आली असता तिच्या अंगावर वीज पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.
तर सोबतची एक महिला जखमी झाली आहे.जखमी महिलेला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले असुन.मृत महिलेच्या पश्चात पती,एक मुलगा, एक विवाहित मुलगी असा आप्त परिवार आहे. या दुःखद घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Discussion about this post