भूम शहरामध्ये शासनाची मध्यवर्ती प्रशासकीय ईमारत आहे. या ईमारती मध्ये तालुका कृषी कार्यालय, तालुका सब रजिस्ट्रार ऑफिस, वन विभाग, वजन काटे मोजणी ऑफिस, ए आर ऑफिस इत्यादी विविध कार्यालय या ईमाराती मध्ये आहेत. या इमारतीला कचरा कुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या कार्यालयाच्या भिंतींना पिचकाऱ्याचे रंग चढू लागले आसून, एकीकडे स्वच्छतेचा जयघोष करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कार्यालये स्वच्छ ठेवण्याकडेच दूर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे़ शहरातील प्रशासकीय इमारतीच्या मुख्य गेटच्या बाजूला भिंतीवर थुंकुन-थुंकून रंग चढविण्यात आला आहे़ या परिसरातील स्वच्छता अपूर्ण असल्याने व सौरक्षण भिंत नसल्याने कार्यालयाच्या बाजूला उघडयावर लघू शंका केली जात आहे़. या कार्यालयातील अनेक खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत़.
तर आतमध्ये भिंतींचे कोपरे रंगले आहेत़ विशेष म्हणजे यात काही अधिकारी, कर्मचारी आघाडीवर असल्याचे दिसून येते़ स्वच्छतागृहामध्ये घाणीचे साम्राज्य असल्यामुळे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना तोंडाला रुमाल बांधून जावे लागते़ वरिष्ठ अधिकारी ही सफाईकडे दूर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते तसेच तेथील रविवारी कार्यालयाला कुलूप लावणे आवश्यक असताना काही कार्यालये सतत उघडी असल्याचे दिसून आले़ तर. विविध कार्यालयाचे या इमारती मध्ये खुर्च्या व टेबल मोडकलीस आल्याने असता व्यस्थ रिकाम्या दिसेल त्या ठिकाणी टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे.
तसेच
स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य आसल्यामुळे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना तोंडाला रुमाल बांधून जावे लागते वरिष्ठांना याबाबत सांगूनही साफसफाई कडे दुर्लक्ष केल्याचे कर्मचारी व नागरिक दबक्या आवाजात चर्चा करतात तर विविध कार्यालयामध्ये ग्रामीण भागातील व शहरातील येणाऱ्या नागरिकांना तसेच अपंग नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही सोय केल्याची दिसून येत नाही. अपंगांसाठी केलेल्या स्वच्छतागृहासमोर मोडलेल्या खुर्च्या तसेच विविध विभागातील आडगळीच्या वस्तु टाकून अपंगांसाठी केलेल्या स्वच्छताग्रहाची वाट बंद करून स्वच्छताग्रहाला कुलूप लावले आहे तसेच या विभागात इतर घाणीचे साम्राज्य कायमचेच आहे़ तर बहुतांश ठिकाणी आवश्यक ती काळजी घेतली नसल्याचे दिसून आले़.
विशेष म्हणजे या इमारतीत एकही सुरक्षा रक्षक दिसून आला नाही़. शहरातील प्रशासकीय मध्यवर्ती या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील आवारे खराब झाल्याने कार्यालयाच्या आवारात उभा राहण्यास देखील हिंमत होत नसल्याचे दिसून येते. पिण्याचे पाणी नाही शहरातील शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नसल्याचे दिसून आले. तसेच तेथील कर्मचारी व अधिकाऱ्यांना पाणी पिण्यासाठी बाहेरच्या हाटेल व अथवा कॅन्टीनचा आधार पाणी पिण्यासाठी घ्यावा लागतो. मध्यवती प्रशासकीय इमारतीमधील काही स्वच्छतागृहांना कुलूप लावण्यात असल्याने येथे येणाऱ्या नागरिकांसह महिलांची मोठी कुचंबणा होते़. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकारी लक्ष्य देणार का अशी चर्चा नागरिक व शासकीय कर्मचारी दबक्या आवाजात करत असल्याचे दिसून येत आहे.
Discussion about this post