भारताचे माजी पंतप्रधान तथा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते डॉ.मनमोहन सिंग यांचे दिनांक 26 डिसेंबर 2024 ला दीर्घ आजारामुळे निधन झाले.त्यानिमित्ताने मोहाडी शहर काँग्रेस कमिटी तर्फे,आज दिनांक 28 डिसेंबर 2024 सायंकाळी 5.00 वाजता. महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ मोहाडी येथे श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यांच्या जीवनचारित्र्यावर दोन शब्द सांगून सामूहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली यावेळी शहर अध्यक्ष विजय शहारे, माजी प.स . सभापती देवा भाऊ निखारे, माजी नगराध्यक्ष गिता बोकडे, रामदास पराते,डॉ हेमंत रहांगडाले, नगरसेवक गणेश निमजे, नगरसेवविका शोभा बुरडे, सविता बावणे, सीमा साठवणे, वंदना मेश्राम, संजुताई गोसेवाडे, पर्यावरण सेल शहर अध्यक्ष रवि थोटे, मधु बुराडे, शैलेश कावळे, गोपाल नीमजे, दिनेश मारबते, नरेश शेंडे मीडिया सेल प्रमूख पराग आगाशे, प्रवीण बुरडे, गोपाल नंदनवार,मदन गडरीये समस्त कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होत.


Discussion about this post