बुलढाणा
प्रतिनिधी:- सुमित डव्हळे
तालुक्यातील देवपूर येथे पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी दि. २७ डिसेंबर रोजी गावातील जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन करीत उपोषण सुरू केले होते; मात्र पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांकडून आंदोलन मागे घेण्यात आले.
गावातील ५५ फुट उंचीच्या पाण्याच्या टाकीवर चढत सरपंचपतीसह ग्रामपंचायत सदस्यांनी आंदोलन सुरू केले होते. गत दोन वर्षांपासून गावातील पाणीपुरवठा
योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
दरम्यान ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता पळसकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन १५ जानेवारीपर्यंत काम मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलक टाकीवरून खाली उतरले. या आंदोलनात आस्तिक वारे, सुनील नरोटे, रघुनाथ नरोटे, हरिष कांबळे, किरण दुतोंडे, दशरथ नरोटे, भगवान धनवटे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.
Discussion about this post