गुन्हा नोंद करून दोन आरोपींना अटक
तालुका प्रतिनिधी – समीर बल्की
चिमूर :- तालुक्यातील पोलीस स्टेशन भिसी अंतर्गत स्थानिक ८ वर्षिय बालकाला माजी प़ाचार्य, पत्नी व २५ वर्षे वयाचा मुलगा यांनी त्यांच्या वाहनाला हात लावला म्हणुन बुधवार ला अमानुष मारहाण केली परंतु पोलीसांनी एन सी देऊन आरोपींना मोकाट सोडल्यामुळे शनिवार ला भन्ते चेतीय संगारामगीरी यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशन भिसी येथे जनसमुदाय धडकताच गुन्हा नोंद करून दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
प़ाप्त माहीती नुसार बुधवार ला सकाळी अंदाजे १० वाजताचे सुमारास पिढीत बालक मंथन शंकर रामटेके वय ८ वर्षे याला सेवा निवृत्त माजी प़ाचार्य सुधाकर पांडुरंग गोहणे, पत्नी कांचन सुधाकर गोहणे व मयुर सुधाकर गोहणे वय २५ वर्षे सर्व राहणार भिसी यांनी त्यांच्या वाहनाला हात लावला म्हणुन दिडशे फुट अंतरावरून ओढत नेऊन आपल्या घरी माळ्यावर व खालच्या परिसरात अमानुष पणे लाथा बुक्यांनी मारहाण केली होती. मात्र पोलीसांनी एन सी पावती देऊन आरोपींना मोकाट सोडल्यामुळे पिढीत बालकाच्या आईने पुन्हा तोंडी तक़ार दिली. तरीही कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यामुळे भन्ते चेतीय संगारामगीरी यांचे नेतृत्वात शनिवार ला सकाळी ११ वाजता चे सुमारास पोलीस स्टेशन भिसी येथे जनसमुदाय धडकताच प़भारी ठाणेदार निशांत फुलेकर यांनी तिन्ही आरोपी विरूद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), १२७(२) व अनुसुचित जाती – जमाती अत्याचार प़तिबंधक अधिनियम- १९८९, ३(२) (व्हि ए) नुसार गुन्हा नोंद केला. त्यानंतर चिमूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी तपास आपल्या हातात घेऊन सुधाकर पांडुरंग गोहणे व कांचन सुधाकर गोहणे या दोन आरोपिंना अटक केलेली आहे. तर आरोपी मयुर सुधाकर गोहणे हा बाहेरगावी असल्याने त्याची अटक होऊ शकली नाही.
भन्ते चेतीय संगारामगीरी यांचे नेतृत्वात, भन्ते महेंद्र संगारामगीरी, माजी प स चिमूर चे माजी उपसभापती रोशन ढोक, भिम आर्मी चिमूर तालुका अध्यक्ष प़ितम भैसारे, जगदीश मेश्राम, आर पि आय चे किशोर अंबादे, उध्दव डेकाटे, आकाश पाटील, मनोज गेडाम, शिध्दार्थ चहांदे, अशोक खापर्डे, धनराज भिमटे, नरेंद्र नगराळे, अनिल चोखांद़े, जगत तांबे, हनुमंत गेडाम, पिढीत बालकाची आई सुर्यकांता रामटेके वडील शंकर रामटेके, माजी सरपंच विश्रांती रामटेके, शामराव रामटेके, प़शांत बन्सोड, तुळशिदास बन्सोड व असंख्य महिला – पुरुष उपस्थित होते.
*बालकाला अमानुष पणे मारहाण करणाऱ्या आरोपींवर विविध कलमांनुसार पोलीस स्टेशन भिसी येथे गुन्हा नोंद करून तिन्ही आरोपींच्या अटकेसाठी तात्काळ पोलीस पथक रवाना करून दोन आरोपींना अटक करण्यात आलेले आहे. तिसरा आरोपी मयुर सुधाकर गोहणे वय २५ वर्षे भिसी याच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना करण्यात आलेले असुन त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल*
*राकेश जाधव
उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर*
Discussion about this post