प्रतिनिधी:- जयेश राऊत
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजकीय सांस्कृतिक केंद्र असलेल्या हरसुल मध्ये सालाबादाप्रमाणे हरसुल संताजी मंडळ आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा भव्य ग्रंथदिंडी सह संपन्न झाला.
एक दिवशीय होणाऱ्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी हरसुल येथील महिला वारकऱ्यांकडून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण याचे आयोजन केले होते. पारायण क्रते महिलांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी चे ग्रंथ डोक्यावर घेऊन तसेच काही महिलांनी तुलसी वृंदावन डोक्यावर घेत मिरवणुकीमध्ये सामील झाले. नाचलोंडी येथील ह. भ. प. पांडू बाबा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीच्या अग्रभागी त्रंबकेश्वर माऊली धाम येथील धनलक्ष्मी सुमन माता वारकरी शिक्षण संस्थेतील ह. भ. प. जगणं महाराज लहारे यांच्या मार्गदर्शनाखाली मृदुंगाचार्य रघुनाथ लहारे यांच्या सोबत बाल वारकऱ्यांनी टाळ मृदूगांचे तालाने लक्ष वेधले. संताजी महाराज पालखीने हनुमान मंदिराच्या आवारातून प्रारंभ करत मुख्य बाजार,बिरसा मुंडा चौक, तोरंगण फाटा, पोलीस स्टेशन मार्गे पुन्हा हनुमान मंदिराच्या प्रांगणात पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी संताजी महाराज ची ह.भ.प. सिताराम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरती करण्यात आली.आरती व सुस्राव्य हरिपाठ झाल्यानंतर सायंकाळ रामायण चार्य हभप भास्कर रसाळ यांचे संकीर्तन झाले.यानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादचे वाटप करण्यात आले.
संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा व पालखी सोहळाचे आयोजन संताजी युवक मंडळ व ग्रामस्थ यांनी करत सोहळा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी परिश्रम घेतले.
सारथी महाराष्ट्राचा न्यूज प्रतिनिधी जयेश राऊत त्र्यंबकेश्वर
Discussion about this post