

प्रतिनिधी,विजय बारस्कर..
आढावा बैठक संपन्न,नागरिकांच्या सोयी सुविधे करिता लक्ष देण्याचा अधिकारी व कत्राटदारांना दिलेले आदेश कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांची हयगय केल्या जाणार नाही.
आढावा बैठकीमध्ये अमरावती शहरातील विविध विषयावर चर्चा करून त्यावर अंमलबजावणी करण्याकरिता घेतलेले निर्णय 23 मजली अमरावती बडनेरा महापालिका 200 कोटी रुपये खर्चाची इमारत आराखडा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश.
अमरावती चौथ्यांदा आमदार बनवल्यानंतर बडनेरा मतदार संघात सोबत संभ्रम पूर्ण अमरावती शहरातील नागरिकांच्या सोयी सुविधांच्या समस्या बाबत व शहरातील विकासात्मक कामासंदर्भात मनपा आयुक्त यांच्या उपस्थितीत सर्व विभागातील अधिकारी यांच्या समवेत जम्बो आढावा बैठक घेऊन या बैठकीमध्ये शहरातील विविध विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
यामध्ये अमरावती मनपा क्षेत्रातील नवीन टॅक्स व वसुलीची स्थगिती आल्यावर सुद्धा जुन्या दराने टॅक्स वसूल संदर्भात नागरिकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्याकरिता जुन्या दराने टॅक्स घेऊन नाहरकत प्रमाणपत्र नागरिकांना देण्याचे निर्देश देण्यात आले.कोंडेश्वर येथे फिशरिज हब सुरू करण्याकरिता चर्चा करण्यात आली अमरावती शहरातील उद्योग उद्यानामध्ये होत असलेला हलगर्जीपणामुळे नागरिकांना प्राप्त तक्रातीवर चर्चा करण्यात आली.
अमरावती शहरातील नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर असलेले कामांना व रस्ते विकास योजनेअंतर्गत शासनाकडून दीडशे कोटी रुपये प्राप्त झाले होते तसेच शहर व सौंदर्यकरण कामासाठी विचारणा करून सदर काम अजून सुरू न झाल्याचे त्या संदर्भात चर्चा करून त्वरित कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
सुकडी कंपोस्ट डेपोवर असलेले कचरावर प्रक्रिया केंद्र संबंधित जागेवर होत असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पावर चर्चा करण्यात आली तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्व प्रकल्पाबाबत आजची कामाची स्थिती व शासकीय जागेवर येणाऱ्या आर्थिक वर्षाच्या पंतप्रधान आवास योजनेवर मागणीवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
त्याचप्रमाणे मनपा विकास शुल्क निधी मधून यशोदा नगर ते जागृती किराणा काँक्रीट रोजचे काम व प्रभात क्रमांक 17 भामटे महाराज झोपडी मंदिर ते गरुडेश्वर मंदिर प्रवेशद्वारापर्यंत नाली व प्रभाग क्रमांक 18 एकनाथपुरम येथील सिमेंट काँक्रेट रोड मधून असलेले प्रशांत नगर पूल ते मोती नगर ते फरशी स्टॉप या कामावर विलंब होऊन अजूनही काम प्रगतीपथावर नसल्याचे नागरिका करून होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील तक्रारीवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला अमरावती शहर बस वाहतूक व वारंवार सूचना देऊन सुद्धा मनपा हत्तीला लागून असलेल्या ग्रामीण भागापर्यंत सुरू करण्याकरता प्रक्रिया विलंब होत असल्यावर चर्चा करण्यात आली शासनाकडून उपलब्ध होत असलेल्या इलेक्ट्रिक कार शेड निर्मिती करून त्वरित नवीन बस सेवा सुरू करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
अमरावती मनपा विभागांचे विकासात्मक कामे पूर्णत्वास नेण्याकरिता शासनाकडून पाठपुरावा निधी उपलब्ध तांत्रिक अडचणी व मनपाची आर्थिक स्थिती मजबूत करण्याकरता शासन स्तरावर पाठपुरावा करण्याकरिता लोकप्रतिनिधी म्हणून त्या विषयावर करून निर्णय घेण्यात आला शासनातर्फे पाठपुरावा करून अमरावती शहरातील विकासामध्ये जास्तीत जास्त भर पाडण्याकरता असतात पाठपुरावा करून विकास कामे मार्गी लावले व मनपाची आर्थिक स्थिती मजबूत असे सांगितले या आढावा बैठकीत अमरावती शहरातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडून त्यांचा समस्यांचा निराकरण जागेवर करून तसे निर्देश सुद्धा अधिकारी यांना दिले व नागरिकांच्या जागेवर न्याय मिळवून देणे नागरिकांना दिलासा दिला.
यावेळी संजय सिंगापुरे सुनील राणा माजी नगरसेवक सुनील काळे माजी नगरसेवक बबन लडके माजी नगरसेविका सुमती डोके माजी नगरसेवक आशिष गावंडे माजी नगरसेवक सचिन रासने उमेश ढोणे मिलिंद कहाळे जैस्वाल गिरीश बनसोड गजानन सावंत पद्माकर गुल्हाने शेखर काळे निलेश मसतकर सुनील इंगोले किरण आंबटकर मोहन सजा अंकुश पकडे इत्यादी सह अमरावती शहरातील नागरिक उपस्थित होते मनपा आयुक्त यांना निर्देश दिले की 200 कोटी रुपये खर्चाची 23 मजली इमारत अमरावती बडनेरा मनपाची इमारत आराखडा प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवण्यात याव्या असे निर्देश आमदार रवी राणा यांनी दिले..
Discussion about this post