आज आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व पत्रकार दिनानिमित्त संत गजानन महाराज मंदिर सभागृह दारव्हा येथे तालुका पत्रकार संघटना सलग्नीत तालुका युवा पत्रकार संघ दारव्हा च्या वतीने दर्पण दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून दै तरुण भारत चे तालुका प्रतिनिधी श्री श्याम पांडे सर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक साहसीक चे जिल्हा प्रतिनिधी दीपक यंगड, तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष,दै पुण्यनगरी चे तालुका प्रतिनिधी राजूभाऊ ठाकरे,दै देशोन्नती चे शहर प्रतिनिधी गजाननभाऊ ठाकरे,दै दिव्य मराठी चे तालुका प्रतिनिधी दत्ताभाऊ काळे,दै नवराष्ट्र चे तालुका प्रतिनिधी शैलेश डहाके,दै मातृभुमी चे तालुका प्रतिनिधी रामकुमार यादव,दै सकाळ चे शहर बातमीदार राम पापळकर,दै विदर्भ मतदार चे तालुका प्रतिनिधी संजय सावळकर,दै हंटर चे तालुका प्रतिनिधी पवन काशीकर,दै विदर्भ केसरी चे तालुका प्रतिनिधी राजकुमार महल्ले आदी पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमात गजानन भाऊ ठाकरे, दत्ताभाऊ काळे, अद्वैत अकॅडमी चे मनोज राठोड सर आणि सामाजिक कार्यकर्ते भीमराव राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरणभाऊ जवके यांनी केले, प्रास्ताविक भाषण दै सुवर्ण महाराष्ट्र चे तालुका प्रतिनिधी वसंताभाऊ लोंढे तर आभार प्रदर्शन दै राष्ट्रबाण चे जिल्हा प्रतिनिधी रणजीत झोंबाडे यांनी केले.
अद्वैत अकॅडमी चे मनोज राठोड, अमोल इंगोले, विरपत्नी अलकनंदा • सरोदे, विरपत्नी ज्योत्स्ना पवार, माजी सैनिक वंजारी साहेब, साबळे साहेब तथा लहुजी चव्हाण वृद्ध कलावंत संघटनेचे अध्यक्ष मोहनदास चव्हाण, पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष राजेश जाधव यांची विशेष उपस्थिती होती.
दर्पण दिन सोहळा सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्यामध्ये आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा , सामाजिक कार्यकर्त्यांचा व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच माजी सैनिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष ईश्वर राठोड तालुका प्रतिनिधी दै. लोकशाही वार्ता,विशाल चव्हाण शहर प्रतिनिधी दैदिव्य मराठी,रणजीत झोंबाडे जिल्हा प्रतिनिधी दै राष्ट्रबाण,विनोद जाधव तालुका प्रतिनिधी दै. सायरण,गोपाल हीवराळे तालुका प्रतिनिधी जनसंग्राम, अशोक जोगदंड तालुका प्रतिनिधी दै साहसिक यांनी मेहनत घेतली.
Discussion about this post