
भारत पवार-देवळा प्रतिनिधी..
येथील देवळा एज्युकेशन सोसायटी देवळा संस्थेच्या श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा या विद्यालयात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ घेतली मकर संक्रांत सणाच्या अनुषंगाने मुलांना पतंग उडवण्याची आवड असते त्या दृष्टीने बाजारात उपलब्ध असलेला नायलॉन मांजा वापरला जातो या नायलॉन मांजा पशु,पक्षी तसेच मनुष्यासाठी किती घातक आहे त्यामुळे पशु,पक्षी व मानव यांना आपले प्राण गमवावे लागतात, अनेक अपघात होतात ,अनेकांना इजा पोहोचते याची माहिती राष्ट्रीय हरित सेना प्रमुख शैलेश खैरनार यांनी दिली तसेच मांजा वापरणारा व विकणाऱ्यावर कोणत्या कलमाने गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा सध्या ॲक्शन मोडवर आहे हे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पगार यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले त्यानंतर विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसह शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र आहेर, सदस्य देविदास भदाणे,यशोमती अहिरे आदीसह शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ घेत तो इतरांनाही न वापरण्यास परावृत्त करण्याचा संकल्प केला..
Discussion about this post