सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या ‘प्रशासन राज’ मध्ये बरेच वर्षे धूळ खात पडून असलेल्या प्रस्तावित अद्ययावत फिश मार्केट संकुलाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. आज या मार्केट इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री ना नितेश राणे उपस्थित होते. गेली कित्तेक वर्षे अशा मार्केट साठी व्यावसायिकांची मागणी होती आयुक्त शुभम गुप्ता यांनी अद्ययावत मार्केट संकुलासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरु ठेवला आज प्रत्यक्ष या कामाची सुरुवात होत आहे तब्बल ८ कोटी इतकी रक्कम मजूर झाली असून ८१ गाळे या इमारतीमध्ये असतील व्यवसायिकांना स्वच्छ पाणीपुरवठा तसेच इमारतीमधील नियमित स्वच्छता आणि इतर आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सोई सुविधा पुरवण्यात येतील. आज या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी मंत्री राणे म्हणाले कि या वास्तूचा आणखी एक मजला आणि कोल्ड स्टोअरेज साठी भविष्यात निधीची कमतरता मी भासू देणार नाही. आजच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी केले ऍड स्वाती शिंदे यांनी या फिश मार्केट चा इतिहास सांगितला या वास्तूसाठी केलेले प्रयत्न पाठपुरावा त्यांनी सर्वाना सांगितला यावेळी खा विशाल पाटील यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. या कार्यक्रम प्रसंगी आयुक्त शुभम गुप्ता (IAS) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले तिन्ही शहरासाठी अद्ययावत फिश मार्केट ची आवश्यकता होती. आज ती पूर्ण होताना दिसत आहे. या अद्यावत इमारतीत आता शीतगृह ही उपलब्ध होणे आवश्यक आहे तसेच आणखीन एक मजला बांधण्यासाठी वाढीव मंजुरी देण्याची देखील या वेळी विनंती त्यांनी मंत्रीमहोदय यांच्या कडे केली. मंत्रीमहोदय यांनी सत्वर हि मागणी तत्वतः मान्य करून फिश मार्केट बाबत सर्व ते सहकार्य करू तसा प्रस्ताव प्राप्त होताच मान्यता देण्यात येईल असे सांगितले, लवकरच या ठिकाणी अद्ययावत फिश मार्केट उभे राहील नागरिकांची आणि व्यावसायिकांची गैरसोय दूर होईल. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मस्त्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी भाजप नेते सम्राट महाडिक, जेष्ठ भाजप नेत्या नीता केळकर, माजी आमदार नितीन राजे शिंदे,माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी ,माजी सभागृह नेता युवराज बावडेकर नगरसेवक सुनंदा राऊत,सुजित राऊत , अल्ताप शिकलगार, मयूर पाटील , माजी सभापती गीतांजली ढेपे पाटील ,शिवसेना (शिंदे गट)जिल्हा अध्यक्ष जिल्हा महेंद्र चांडाळ, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, उपायुक्त विजया यादव ,सहा आयुक्त नकुल जकाते , मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद ,नगरसचिव सहदेव कावडे ,नगररचनाकार आर व्ही काकडे , नगर अभियंता वैभव वाघमारे ,मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते,
Discussion about this post