•या भेटीत त्यांनी कार्यक्रमाची प्रगती आणि आदिवासी समुदायाला मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा आढावा घेतला.
• या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आदिवासी समुदायाला दर्जेदार आरोग्य सेवा देणे, तसेच त्यांच्यात आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करणे आहे. आमदारांनी या प्रकल्पासाठी कार्यरत कर्मचार्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
•यावेळी त्यांनी आरोग्य सेवांसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच, आदिवासींच्या तशेच आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत असल्याचे सांगितले. स्थानिक नागरिकांनीही या भेटीदरम्यान आपले प्रश्न मांडले, ज्यावर आमदार रामदास मसराम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
•या भेटीदरम्यान गावातील काही प्रमुख व्यक्ती व आरोग्य क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते. गेवर्धा येथील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यातील सुधारणा व अधिक सुविधा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.त्या प्रसंगी उपस्थित काँग्रेस तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट,सरपंच मडावीताई,रोशन सय्यद,हेमंत सिडाम, आशिष टेंभुर्णे ,राजू बराई,बबलू शेख,सुनील कीलनाके राजेंद्र कुंभरे.उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ…..
✍🏻प्रतिनिधी:- प्रविण डी कोवाची (9637165828)
Discussion about this post