
झारगडवाडी/बारामती :
मारली बाजी : यशवंतराव चव्हाण क्रीडा स्पर्धा तालुकास्तरीय स्पर्धा बारामती येथे घेण्यात आलेल्या होत्या. यामध्ये बारामती तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता.
त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांघिक खेळ तसेच वैयक्तिक खेळ याच्या मध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेतलेला होता. त्या मधीलच उंच उडी स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झारगडवाडी येथील इयत्ता ४थी मधील विद्यार्थिनी कुमारी. भाग्यश्री नवनाथ नाळे हिने उंच उडी स्पर्धेत लहान गटात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला.कुमारी. भाग्यश्री नवनाथ नाळे हिचा तालुक्यात स्तरीय उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याने तिला प्रशस्त पत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले.
तशीच तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करणेत आलेले आहे. तसेच तिला स्पर्धेसाठी मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर तसेच लाटे सर , लडकत सर , गुरव मॅडम, नाळे मॅडम, लडकत मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले.
Discussion about this post