सावनेर प्रतिनिधी : 9881477824
सावनेर खेडकर लेयोऊट येथील पाण्याचा बोरवेल हॅन्ड पंप गेले सहा वर्षापासून बंद पडलेला आहे. प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही अजून पर्यंत त्यावर कोणतीही कारवाही केलेली नाही. जर हा हॅन्ड पंप सुधरवीला नाही तर तो नेहमीसाठी खराब होण्याची शक्यता आहे. व तेथील रहिवाशांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागेल. १६/०१/२०१९ ला त्यावेळचे मुख्याधिकारी नगरपरिषद यांना त्या परिसरातील लोकांनी अर्ज केला होता. वार्ड नंबर आठ येथील यशवंत भुडके, वसंतराव तळखंडे, विनोद चव्हाळे, बळीरामजी थोटे, गुणवंतराव गिरडकर, इतर अन्य रहिवाशनी केला होता.
प्रतिनिधी होण्यासाठी संपर्क:7744922000



Discussion about this post