पारडी (ठवरे)वाघाच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी नागभीड तालुक्यातील पारडी (ठवरे) येथे वाघाच्या हल्ल्यात गुरुदेव पुरुषोत्तम सारये वय 45 वर्ष हा इसम गंभीर जखमी झाला आहे.
शेतात गेलेल्या शेतमजूरा वर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करत जबरजखमी केल्याची घटना दिनांक 10 जानेवारी ला घडली आहे. त्यामुळे पारडी परिसरात शेतकरी आनी शेतमजूरा मध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
जखमी वर सर्वोदय हॉस्पिटल ब्रम्हपुरी येथे उपचार सुरु आहेत.
Discussion about this post