भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिमशुक्रवार दिनांक १० जानेवारी व शनिवार दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी नाशिक पंचवटी येथील भावबंधन मंगल कार्यालय मधील जेष्ठ उद्योगजक देवकिशनजी सारडा साहित्य नगरीत दोन दिवसीय तिसरे अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात जल्लोषात पार पडले,
या साहित्य संमेलनात जेष्ठ साहित्यिक डॉ.शंकर बोराडे पुरस्कार तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांना प्रदान करण्यात आला.सकाळी १० वाजता ग्रंथ दिंडी ने संमेलनाची सुरुवात झाली.
प्रेरणा फाऊंडेशन महिला मंडळांनी मंगळागौर सादर केली, रामकृष्ण हरी महिला यांनी भजनाचा भक्ती प्रधान कार्यक्रम सादर केला,तर प्रयास फाउंडेशनच्या दिव्यांग मुला मुलींनी शिक्षकांनी महाराष्ट्र लोकगाथा मध्ये विविध पारंपरिक गाणी सादर केली.दुपारी १२ वाजता उद्घाटक रघुवीर खेडकर यांच्या हस्ते शेकोटी प्रज्वलन करून पूजन करण्यात आले,
यावेळी संमेलनाचे अध्यक्षा प्रा.सुमती पवार, स्वागताध्यक्ष अड.नितीनभाऊ ठाकरे, शिवकन्या बढे, लावणी सम्राज्ञी माधुरी पवार, तमाशा महोत्सव अध्यक्ष वसंतराव जगताप,गिरणा गौरव प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुरेश पवार, कार्याध्यक्ष रविंद्र मालुंजकर , संयोजक किरण सोनार व संजय आहेर, पत्रकार साहित्यिक गीतकार भारत कवितके सह महाराष्ट्र राज्यातील कवी लेखक गीतकार लोक कलावंत मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
शेकोटी भोवती महिला व पुरुष यांनी फेर धरला नृत्य केले.संमेलन उद्घाटक सत्कार मूर्ती तमाशा सम्राट रघुवीर खेडकर म्हणाले की ” मी माझ्या तमाशा तर नेहमीच राजा असतो,पण आज मात्र मी या संमेलनात विद्यार्थी आहे,मी माझ्या बंधनात रमराण असतो,१९६९ पासून मी तमाशात काम करतो” आणि आपल्या जीवनातील संघर्षाबद्ल अनेक गोष्टी रसिकांना सांगितल्या.
दुपारी लावणी स्पर्धा सुरू झाली,याचे सूत्र संचालन प्रतिभा सोनार यांनी केले तर परीक्षक म्हणून जितेंद्र चव्हाण उपस्थित होते, लावणी सम्राज्ञी माधुरी पवार यांनी लावणी नृत्य करुन रसिकांची परमाईश पूर्ण केली.या लावणी स्पर्धेत अनेक लावण्यवती नी सहभाग घेतला होता.यातील लावण्यवती डॉक्टर, वकील,व उच्च शिक्षित होत्या.यामध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी पाटील यांनी अहो शेठ लयं दिसांनी झालीय भेट या लावणी वर पटकावला,
दुसरा क्रमांक सानिका बागुल यांच्या ईष्काचा बाण या लावणी ला तर तिसरा क्रमांक सोनाली सूर्यवंशी यांना पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची या लावणीला मिळाला.रात्री जेवणानंतर १० वाजता कवी संमेलन सुरु होऊन सकाळी ६ वाजता संपले.
रात्रभर कवी संमेलन रंगत गेले.” पुस्तकावर बोलू काही” या कार्यक्रमात कवी गीतकार विष्णु थोरे यांनी सांगितले की,” गाणे लिहीण्यासाठी मिटर असावा लागतो,कातड्यापेक्षा आतड्यावर प्रेम करायला शिकले पाहिजे, काळाच्या ओघात नियतकालिके बंद होत गेली, चिंतनाच्या पातळीवर आल्यावर गाणे तयार होते.
प्रत्येक कलावंता जवळ एक वेदना असते, दुःख घेऊन मिरवितो तीच तर कविता असते, गाण्यावर थिरकायला होते,तर कवितेने काळजी हलते,” दुसऱ्या दिवशी सकाळ पासून दिवस भर अनेक लोक कलावंतांनी आपापल्या कला सादर केल्या.सायंकाळी या दोन दिवस चाललेल्या मनोरंजनातून प्रबोधन कार्यक्रमाचा समारोप झाला.कवी, लेखक, गीतकार सामाजिक कार्यकर्ता, विचारवंत, अभ्यासक, पत्रकार,व लोक कलावंत मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Discussion about this post