.रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी पुणे पत्रकार भवन येथे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल ” महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार २०२५” मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.विसावा सोशल फाउंडेशन आणि हिरकणी महिला विकास संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे राष्ट्रीय युवा सामाजिक संमेलन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी कला, संस्कृती, साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता,अशा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरुष व महिला यांना राष्ट्रीय युवा सामाजिक संमेलनात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.भारत कवितके यांचा हा ११५६ वा पुरस्कार असून ही पुरस्कार संख्या पत्रकारिता साहित्य गीतकार,व सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याने मिळाले आहेत,
सांज, माझ्या गावाच्या दिशेने, आकाश तारकांचे, अरे मी एकटा, शोधतो मी किनारा,मी एक वृत्तपत्र लेखक, आणि आयुष्य उसवताना हे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहेत धन्यवाद.तर उन्हाची सावली, हरवलेले क्षण हे दोन काव्य संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.भारत कवितके यांचे मूळ गाव पंढरपूर आहे,
लहान पणापासून अत्यंत संघर्ष मय परिस्थिती तून यशस्वी झालेले भारत कवितके साहित्यिक म्हणून संवेदनशील आहेत पण पत्रकार म्हणून निर्भिड, बेधडक पणे वावरताना दिसतात.आयुष्य उसवताना हे त्यांच्या स्वतःच्या संघर्ष मय जीवनावर वास्तव दर्शविणारे आत्मचरित्र साहित्य जगत मध्ये फारच लोकप्रिय झाले आहे.
या आत्मचरित्राला तीन राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.या पुरस्कार सोहळ्यात अध्यक्षा भूमाता ब्रिगेड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,” देवाने कधीही महिला पुरुष मध्ये भेदभाव केला नाही, त्यासाठी मी आंदोलन केले व यशस्वी झाले.
टिका विरोधकांना घाबरून घरी बसू नका, इच्छा शक्ती प्रबळ असायला हवी.पुरस्कार मिळाले आता आणखी चांगली कामगिरी करा.” या पुरस्कार सोहळ्यास तृप्ती देसाई, अभिनेता ध्रुव दातार, अनिल वेदपाठक, संदीप राक्षे,स्वाती तरडे,खरात सर, आयोजक संयोजक शर्मिला नलावडे व विविध क्षेत्रातील पुरस्कार्थी पुरुष व महिला आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Discussion about this post