भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.मानखुर्द मुंबई येथील नॅशनल इंग्लिश हायस्कूलच्या २० व्या वार्षिक लक्ष मॅगझिन चा प्रकाशन सोहळा सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार रामदासजी आठवले यांचे हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यंदाच्या या लक्ष मॅगझिन मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्य, कला, विज्ञान विषयक प्रकल्प, समाज भान जागवणारे विषयावरील लेखाचा समावेश आहे.लक्ष नावाने ओळखले जाणारे मॅगझिन विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतच्या आणि ज्ञानाचा सुंदर मिलाप सादर करते,शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे हे मॅगझिन शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी उदाहरण आहे
.शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका डोंगरे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना लक्ष ठेवून शिक्षणाची उंच शिखरे गाठण्याचे आवाहन केले व शाळेच्या प्रगती बद्दल अभिमान व्यक्त केला.शाळेच्या या उपक्रमा मुळे विद्यार्थ्यांना आपले विचार आणि प्रतिभा सादर करण्याची एक अव्दितिय संधी मिळाली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार रामदासजी आठवले,शिक्षण उपसंचालक सुनील सावंत, मानखुर्द येथील पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, नॅशनल इंग्लिश हायस्कूलच्या सर्व शिक्षक संघाच्या सर्व सभासदांनी एकाच दिवशी लक्ष मॅगझिन प्रकाशित केले.
आणि १व २ फेब्रुवारी २०२५ रोजी लल्लुभाई कंपाऊंड, मानखुर्द मुंबई येथे दोन दिवस चालणाऱ्या बाल महोत्सव २०२५ ला या वर्षी वार्षिक स्नेहसंमेलना साठी पालक वर्ग व विभागातील लोकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुनील भोवते,अड.कल्पना भोवते, संचालक योगेश सानप, मुख्याध्यापिका सारिका डोंगरे, समन्वयक वसुंधरा शिर्के, सर्व शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Discussion about this post