4 दिवस चाललेल्या या स्पर्धेत मर्यादित 12 संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये संघर्ष 11 कागोणी संघाने जगदंब 11सोनई संघाला पराभूत करत विजेतेपद पटकावले. सोनई संघाला उपविजेतापदावर समाधान मानावे लागले. सावकार 11भेंडा या संघाला तृतीय क्रमांक व भेंडा बुल्स या संघाला चतुर्थ क्रमांक वर मिळाला. विजयी संघाना अनुक्रमे 51000हजार रुपये, 31000हजार रुपये, , 21000हजार रुपये, 11000हजार रुपये व चषक देण्यात आले.सामनावीर म्हणून किरण शिर्के हा खेळाडू ठरला. तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून समीर पठाण याला गौरविण्यात आले.त्यात उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सोनई संघाचा शुभम ताके हा ठरला.
यावेळी बक्षीस वितरणासाठी अनिल शेवाळे साहेब, आशोक दादा मिसाळ, शिरीष लांडगे सर, भारत वाबळे सर, सय्यद सर ,अंशुमन जाधव साहेब, अशोक भाऊ साळवे, स्वप्नील बोधक, आंबादास गोंडे, आदी बक्षीस दाते मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी लोकनेते मारुती राव घुले पाटील क्रीडा प्रबोधनी चे अध्यक्ष किशोर भाऊ मिसाळ, रवींद्र डौले सर, नोहिद पटेल व सर्व सदस्यानी सहकार्य घेतले.
Discussion about this post