
दिग्रस् येथील प्रणित मोरे यांनी जण संघर्ष अर्बन निधी लिमिटेडच्या हजारो ठेवीदारांची ४४ कोटींची फसवणुक केली. प्रणित मोरे सह ६ संचालक करोडो रुपये घेऊन पसार झाले होते. या प्रकरणी दिग्रास पोलिसांनी गुन्हे दाखल करून गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक केली. मात्र सदर घटनेला दीड महिना उलटून सुधा ठेवीदारांचे कष्टाच्या पैशासाठी संघर्ष सुरू आहे. आज अनेक ठेवीदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन जण संघर्ष मधे नेमणूक करा, मालमत्ता जप्त करसह अनेक मागण्यांचे निवेदन दिले.
Discussion about this post