10 वी, 12,वी, आय टी आय विद्यार्थ्या करीता २२ ऑगस्ट रोजी
अमरावती शहरात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन.
प्रतिनिधी अमरावती :
सुवी सीए अकॅडमी, (सुवी बहुउद्देशीय आदिवासी महिला व बालविकास सेवा संस्था, नागपूर द्वारा संचालित उपक्रम), श्री. शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती आणि वैभव इंटरप्राइज, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती या ठिकाणी दि. २२ ऑगस्ट,२०२४ (गुरुवार) रोजी सकाळी ११ वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात पदभरती करण्यासाठी *केईसी इंटरनॅशनल पिक्स ट्रान्समिशन लि. व स्पेसवुड फर्निशर, मींत्रा , फ्लिपकार्ट इत्यादी या नामांकित कंपन्या मधे नागपूर आणि मुंबई करीता पदभरती करण्यात येणार आहे.
18 ते 35 वयोगटातील दहावी, बारावी, पदवीधारक, आय टी आय, मेकॅनिकल इंजिनिअर पदविका, पदवीधारक उमेदवारांना या रोजगार मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. 14000/- ते 18000/- प्रती माह या पगाराच्या नोकरी करीता 700 जागांकरीता पदभरती करण्यात येणार आहे.
या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी वेळेवर मेळाव्याच्या ठिकाणी नोंदणी करायची आहे. नोंदणी करताना परिचय पत्र (Resume) आधार कार्ड, सर्व शैक्षणिक गुणपत्रिकांच्या छायांकित प्रती यांच्यासह २ पासपोर्ट आकाराचे फोटो आणि नोंदणी शुल्क १००/- रुपये घेऊन उपस्थित राहायचे आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांना ८७६७१२५३८५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.* Resume याच मोबाईल नंबर वर WhatsApp करावा.
या व्यतिरिक्त कोणतेही फी किवां रक्कम उमेदवारांकडून घेतल्या जाणार नाही. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. काही अडचण भासल्यास वर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.
या रोजगार मेळाव्यात तरुण – तरुणींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सुवी बहुउद्देशीय आदिवासी महिला व बालविकास सेवा संस्था, नागपूरचे अध्यक्ष डॉ. विलास पाटील, श्री. शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट व वैभव इंटरप्राइज, नागपूरचे संचालक मयूर उजवणे यांनी केले आहे.
Discussion about this post