इंदापूरला 23 तारखेला अजित पवार, सुनील तटकरे, आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये होणार जनसन्मान यात्रा
जनसन्मान यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आमदार दत्तामामा भरणे यांनी केले आवाहन…
इंदापूर तालुका प्रतिनिधी – संतोष मिंड
शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाची जन सन्मान यात्रा इंदापूर मध्ये दाखल होणार असून येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार जाहीर सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रेला 09 ऑगस्ट पासून नाशिकच्या दिंडोरीतून सुरूवात झाली होती.. या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार जिल्हानिहाय दौरा करत महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. ही जनसन्मान यात्रा दिनांक 23 ऑगस्ट रोजी इंदापूर तालुक्यात येणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. सकाळी 10 वाजता जुनी मार्केट कमिटी इंदापूर या ठिकाणी भव्य जाहिर सभा आयोजित केली आहे. यानिमित्ताने ते इंदापूर विधानसभेचा आढावा घेणार आहेत. अजितदादा पवार इंद्रेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे.. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर अजित पवार या यात्रेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात विविध ठिकाणी महिलांशी संवाद साधणार आहे..
इंदापूर तालुक्यातील सर्वांना लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी केले आहे.
Discussion about this post