
•आमदार सौ. चित्राताई वाघ, डॉ आयुश्री आशिषराव देशमुख यांची उपस्थिती.
•चित्रा वाघ यांनी आमदार डॉ आशिषराव देशमुख आणि डॉ आयुश्री आशिषराव देशमुख यांच्या सामाजिक कार्याचा केला गौरव.
कोहळी येथे 19 जानेवारी 2025 ला कार्यक्रम च्या आयोजक रंजनाताई संजय चीचखेड यांनी आयोजन केले होते .भव्य हळदी-कुंकवाचा कार्यक्रम हजारो महिलांच्या उपस्थितीत मोठ्या हर्षाने पार पडला. यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले होते. कार्यक्रमबोलताविधानपरिषद सदस्या सौ चित्राताई वाघ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
त्यांनी आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रामधून न भूतो न भविष्यती असा विजय संपादन केला, असे गौरवोद्गार काढले. सामाजिक जीवनात आमदार साहेब आणि आमदारांच्या सौभाग्यवती डॉ आयुश्री आशिषराव देशमुख हे नेहमी गोरगरीब लोकांच्या कल्याणासाठी कार्यरत असतात, त्यांनी गर्भवती महिलांसाठी लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूरमध्ये मोफत डीलिवरीची सुविधा उपलब्ध करून दिली, ही मोठी गोष्ट आहे आणि याबद्दल त्यांचे कौतुक करावेसे वाटते, असे म्हटले.
आमदार डॉ आशिषराव देशमुख हे सुरू करत असलेल्या कॅन्सरमुक्त अभियानासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
डॉ आयुश्री आशिषराव देशमुख आपले मनोगत व्यक्त करताना महिलांच्या अनेक समस्या कशा असतात आणि त्यावर कशा उपाययोजना कराव्या, याबद्दल मार्गदर्शन केले. आणि संपूर्ण सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्र कॅन्सर मुक्त करणार, गावागावात डॉक्टरांची टीम तपासणी करणार, असे सांगितले.
मकरसंक्रांतचे महत्व त्यांनी महिलांना समजावून सांगितले आणि शेवटी बोलताना त्यांनी आम्ही सावनेर-कळमेश्वर क्षेत्राला विकासकामात मागे पडू न देता सतत विकासकार्य करू, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या आयोजक रंजनाताई चिंचखेडे ह्या होत्या.
कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती मीना तायवाडे मा. पं .स. सभापती, बेबीताई धुर्वे, प्रगतीताई मंडल, निशाताई खडसे, वीणाताई ठाकरे, शीतल खंडाळकर, ममता वैरागडे, अल्का सक्सेना, प्रीतीताई ताजने यांची होती.
. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला

Discussion about this post