


शेतकऱ्यांना दहा रुपयांत मिळेल जेवण
*कु्षी उत्पन्न बाजार समिती सावनेरचा उपक्रम*
माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते शुभारंभ
सावनेर: सावनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी सावनेर कृषी यार्डात आपला शेत माल विकण्यासाठी येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना फक्त १० रुपयांत जेवण उपलब्ध करवून देत एक आदर्श निर्माण केला आहे.
१४ फेब्रुवारी रोजी, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि क्षेत्राचे माजी आमदार सुनील बाबू केदार यांच्या हस्ते कृषी उत्पन बाजार समितीच्या उपहारगृह येथे किसान भोजन योजनेच उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी कॅन्टीनचा रिबन कापण्यात आले तसेच सहकार महर्षी कै. बाबा साहेब केदार यांच्या चलचित्राचे विधिवत पूजन व दिपप्रज्वलन करुण करण्यात आले.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष रवींद्र चिखले, उपाध्यक्ष प्रकाश लांजेवार, व्यवस्थापकीय सदस्य प्रवीण झाडे, अशोक डावरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शेषराव राहटे, माजी पंचायत समिती सभापती गोविंदा ठाकरे, माजी उपसभापती प्रकाश पराते, बाबाराव कोढे अध्यक्ष खरेदी विक्री संघ कलमेश्वर, माजी जिल्हा परिषद सदस्य बैजनाथ डोंगरे, प्रकाश खापरे, सावनेर तालुका काँग्रेस अध्यक्ष सतीश लेकुरवाले, व्यापारी संघ सावनेरचे माजी सचिव मनोज बसवार, प्रा. साहेबराव विरखरे, सावनेर कळमेश्वर विधानसभा युवक काँग्रेस सरपंच विष्णू कोकार्डे इत्यादी प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना माजी मंत्री सुनील केदार म्हणाले की, नागपूर जिल्ह्यातील कृषी उत्पन बाजार समिती सावनेरने या महागाईतही शेतकऱ्यांसाठी फक्त दहा रुपयात डाळ, भात, भाजी, पोळी, पापड, लोणचे इत्यादी पूर्ण जेवणाची नियमित व्यवस्था करून एक आदर्श निर्माण केला आहे. यासाठी कृषी उत्पन बाजार समिती सावनेरचे अध्यक्ष रवींद्र चिंखले, उपाध्यक्ष प्रकाश लांजेवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन करत उपस्थित शेतकरी बांधवासोबत बसुन जेवणाचा आस्वाद घेतला.
आयोजनाच्या यशस्वीते करीता कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेरचे सदस्य सुरेश नवले,विनोद जैन, सुरेश केने,सुभाष रहाटे, अशोक डवरे, प्रविण झाडे, देवाजी मुलमुले मयूर जिचकर, चंद्रशेखर कुंभकर,दुर्वास लाखे,जगदीश ठाकरे,बाळू काळे इत्यादींसह सर्वांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी: सूर्यकांत तळखंडे 9881477824
Discussion about this post