
बनशेळकीच्या आरोग्य शिबीरात१५० जणांची मोफत तपासणी
उदगीर (श्रीधर सावळे) प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही उदगीर तालुक्यातील बनशेळकी येथील विठ्ठल रुक्माई मंदिर येथे संत तुकाराम यांच्या अनुगृह दिवसानिमित्त ५२ वे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्याने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन डॉ. माधव चंबुले यांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीर बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव हुडे होते. यावेळी उदगीर न.प. चे माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, बाजार समितीचे संचालक रवींद्र कोरे, जगदीश बाहेती, डॉ. सुनील बनशेळकीकर, डॉ. दत्तात्रय पाटील, डॉ. रामेश्वर जाधव, डॉ. सचिन कापडे, डॉ. सुशील चंबुले, रविंद्र हसरगुंडे, राम मोतीपवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.या शिबीरात गावातील १५० जणांची तपासणी करण्यात आली. तसेच मोफत औषधी वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. माधव चंबुले यांनी, बनशेळकी हे गाव आपण दत्तक घेत असून कोणताही रुग्ण आपल्याकडे आल्यास त्यांना सवलत देण्यात येईल. यापुढे उदगीर शहरात मोठे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा मानस असून या ठिकाणी मुंबई, पुणे, हैद्राबाद, बेंगळुरू याठिकाणी जे रुग्णांना सेवा, सुविधा मिळतात, ते सर्व उपचार व सेवा देण्याचा आपला प्रयत्न राहील, जेणेकरून रुग्णांच्या जीव व नातेवाईकांची धावपळ व पैसा दोन्ही वाचतील, असेही सांगितले.यावेळी शिवाजीराव हुडे यांनीही विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाला चेअरमन प्रल्हाद महाजन, माजी सरपंच शिवलिंग भेदे, सतीश मचकूरे, नामदेव सावळे, एकनाथ सुर्यवंशी, सुर्यकांत श्रीमंडले, पत्रकार मनोहर लोहारे, मनोज जाधव, उमाकांत श्रीडॊळे, बाबुराव मालकापुरे, श्याम पाटील, महादेव बिरादार, उमाकांत श्रीमंडळे, बाळू चव्हाण, संग्राम गवरे, औदुंबर येरनाळे,आदी उपस्थित होते.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई हॉस्पिटल व साई डेंटल केअरच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार अखंड हरिनाम सप्ताहाचे अध्यक्ष नागेश आंबेगावे यांनी केले.
Discussion about this post