प्रतिनिधी : अमोल कोलते फुलंब्री: तालुक्यातील बाबरा येथील बालाजी मंदीरात 5 किलो 600ग्राम चांदी मिळुन आल्याने चर्चेला उधाण पोलीस अधीक्षक श्री विनयकुमार राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुनिल लांजेवार साहेब यांच्या देखरेखीखाली वडोदबाजार पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री सुनिल इंगळे यांच्या उपस्थितीत बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .
फुलंब्री तालुक्यातील श्री बालाजी संस्थान तिर्थक्षेत्र मंदिर बाबरा,मागील 500 वर्षापासून चा ईतिहास या मंदिरास असुन नावलौकिक आहे
” तिरुपती बालाजी – सावकार, तिरुपती बालाजी – देऊळगाव राजा – राजा , तिरुपती बालाजी – बाबरा ता फुलंब्री – जहागिरदार ,अशी अख्यायिका व नावलौकिक असुन काल च्या घटनेची चर्चा पण खरी व नाव लौकीक मिळत आहे
श्री तिरुपती बालाजी संस्थान तिर्थक्षेत्र बाबरा येथे, भक्त निवास व्यवस्था साठी,जागेची कमतरता भासत होती ,दिनांक 16/02/25 वार रविवार रोजी श्री निखील बाळुशेठ महाले ,यांचे आजोबा व आजी बाबऱ्याचे आहेत ,व त्याची ईच्छा होती, कि बालाजी मंदिराला लागुनच असलेली जागा मंदिर ट्रस्ट ला दान देणे आहे,कालच्या काल सर्व ट्रस्ट चे मंडळ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जागेची मोजणी करून ,कै बाबुशेठ रामचंद्र महाले, (सोनार )याची जागा 124.7 चौरस मिटर ,1300,37 स्केअर फुट, यातील आर्धी निम्मी जागा ही कै रमेश बाबुशेठ महाले,व कै बाळासाहेब बाबुशेठ महाले यांच्या स्मरणार्थ श्री तिरुपती बालाजी संस्थान मंदिर ट्रस्ट ला दान करण्यात आली, ट्रस्ट मंडल यांचे कडुन श्री निखिल बाळासाहेब महाले ( सोनार ) यांचा सत्कार करण्यात आला,व नारळ व प्रसाद देण्यात आला यावेळी, रामचंद्र जाधव ,शिवा पाटील,सुधाकर महाले यांच्या व बाबरा येथील मंदिर ट्रस्टी श्री कचरु मैंद, प्रदिप खंडेलवाल, चंद्रभान पवार,संजय चव्हाण,सह गावकरी मंडळी ची उपस्थित होते
” त्यानंतर लगेचच खोदकाम करण्यास सुरुवात केली तीन ते चार फुट खोल खोदकाम करतांना गुप्तधन मिळुन आले,डंडवळे,कडुळे, गळ्यातील हस, चांदीच्या साखळी,सर्व चांदीच्या वस्तू दिसुन आल्या , ताबडतोब ट्रस्ट मंडल, यांनी ताबडतोब ,वडोद बाजार पोलिस स्टेशन ला व तहसिलदार फुलंब्री श्री कृष्णा कांनगुले व पुरातत्व विभाग यांना कळविण्यात आले, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री सुनिल इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला, रात्री उशीरापर्यंत सर्व रिपोर्ट तयार करून व मोजमाप करुन पोलिस बंदोबस्तात सुरक्षीत ठेवण्यात आले
काल उशीर झाला असल्याने आज दिनांक 17/02/25 वार सोमवार रोजी श्री तिरुपती बालाजी संस्थान मंदिर ट्रस्ट चे पदाधिकारी तहसिलदार कानगुले सर , पोलिस स्टेशन वडोद बाजार इंगळे सर व अधिकारी व कर्मचारी,गावकरी , तसेच ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते,सर्वांच्या उपस्थितीत आज सर्व मिळालेल्या वस्तूंची शहानिशा बाबरा येथील हरि ओम ज्येलर्स श्री शिवनारायण सोनवणे यांनी केली त्यावरुन ती पुर्वी ची शुद्ध चांदी असल्याचे दिसून आले,सर्व एक एक नग गिनती मोजणी करुन पंचनामा करण्यात आला,आज पुन्हा एकदा वजन करण्यात आले असता 5 किलो 600 ग्राम भरले आहे,सर्वांच्या उपस्थितीत सिल बंद करुन तहसिलदार कृष्णा कानगुले यांना सुपूर्द करण्यात आले
मंदिर ट्रस्ट ची बांधकाम करण्यासाठी काही मदत व्हावी अशी विनंती करण्यात आली असता , प्रोसेस नुसार आपणास पाठपुरावा करावा लागेल अशी विश्वासनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजते आहे,
श्री निखिल बाळासाहेब महाले ( सोनार ) यांना पण ट्रस्ट मंडळ यांनी फोन करुन घडलेली हकीकत सांगितली असता त्यांनी आम्हाला काही लागत नाही, फक्त श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार समाजासाठी , भक्त निवास मधे व्यवस्था करण्यात यावी, तसेच कै बाबुशेठ रामचंद्र महाले ( सोनार ) आजोबा यांच्या व कै रमेश बाबुशेठ महाले व कै बाळासाहेब बाबुशेठ महाले यांचे नावाने स्मरण असावे , आजुन काही अडीअडचण असल्यास ,जागा दान दिली आहे, तसेच 5 किलो 600 ग्राम चांदी ,देणगी व दान स्वरुपात दानच आहे,काहीही मागणी न करता व अजुन ही भविष्यात दान देणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले .
Discussion about this post