

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
या शहराची व्यापारी दृष्ट्या होणारी प्रगती पाहता या शहरात सरकारी मोकळ्या जागेवरील अतिक्रमणांची देखील प्रगती उत्तरोत्तर होत आहे दोन दिवसापूर्वीच जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावरील अतिक्रमणाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
आता आमच्या प्रतिनिधीने पाथरीशहरात फेरफटका मारला असता केंद्र सरकारच्या अत्याधित असणारे पोस्ट ऑफिस ची पात्री शहरातील इमारत शहराच्या मध्यवस्तीत आहे आजूबाजूला बरीचशी कुटुंबे राहतात पोस्ट ऑफिसच्या समोरच बेलदार समाजाचे शादी खाना आहे दोन्हीच्या समोर पोस्ट ऑफिस मध्ये प्रवेश करण्यासाठी दोन गेट आहेत.
मोठे गेट वापरात असून छोट्या गेट समोर अतिक्रमण झालेले आहे त्याचा फोटो माहितीस्तव प्रसिद्ध करत आहोत हे अतिक्रमण कोणी केले कुणाच्या परवानगीने केले याचा कुणालाही सुगावा नाही बऱ्याचशा नागरिकांना हा प्रश्न पडतो की पाथरी शहरात हे काय चाललंय महत्त्वाच्या ठिकाणी अतिक्रमण होतात आणि संबंधित अधिकारी डोळेझाक करतात
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
Discussion about this post