
उदगीर / कमलाकर मुळे :
सुकणी येथील स्वा.सावरकर माध्यमिक विद्यालय इयत्ता दहावी मधील शिकणार्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थेचे सचिव श्री सुनिल रामराव सुकणे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मिरा सुनिल सुकणे उपस्थित होते.यात इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिनात सहभाग घेतला.
यामध्ये शाळेच्या नियमाप्रमाणे सराव परीक्षा दोनच्या मार्कानुसार प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास मुख्याध्यापक करण्यात येते तसेच इयत्ता दहावी मधून मुळे साक्षी ज्ञानोबा ही प्रथम आली आहे म्हणून तिला मुख्याध्यापिका म्हणून तिची निवड झाली आहे तसेच लिपिक पदासाठी केदासे क्रांती माधव यांची निवड झाली आहे. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी विद्यालयांमध्ये स्वयंशासन दिन अतिशय उत्साह मध्ये साजरा करण्यात आला एक दिवस संपूर्ण शाळा चालविण्याची जबाबदारी इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना सोपवण्यात आली या मागचा हेतू असावा होता की विद्यार्थ्यांना अध्यापन करीत असताना शिक्षकाविषयी चे खूप आकर्षण असते व आदर असतो आपणही एक दिवस शिक्षक व्हावी अशी विद्यार्थ्यांची इच्छा असते पण भविष्यामध्ये ही संधी प्रत्येक विद्यार्थ्याला मिळेलच असे नाही याची जाणीव ठेवून स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालयाने अतिशय उत्साहाने स्वयंशासन दिन साजरा केला इत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी साक्षी ज्ञानोबा मुळे हिला सराव दोन परीक्षेमध्ये सर्वात जास्त मार्क पडल्यामुळे तिला मुख्याध्यापका म्हणून तिची निवड करण्यात आली तसेच शिक्षकांचे भूमिका सुकणे श्रुती हनुमंत सुकणे निकिता मारुती सभा सारे श्रद्धा अंकुश केदासे, वैष्णवी वेंकट, मुळे प्रणिता परमेश्वर, केदासे आरती राजकुमार, सुकणे आकांक्षा बाळासाहेब, केदासे अलका तुळशीदास, गोटमुकले वैशाली नर्सिंग, भंगे रोशनी तेजराव ,गोटमोकळे ऋतुजा विनोद तसेच मुलांमध्ये मुळे रुद्र प्रताप राजकुमार मुळे, सोहम विठ्ठल ,सबासारे सुरज लहू, गोटमुकले सुरेश परमेश्वर, उकंडे ओमकार प्रकाश, मुळे सुमित विठ्ठल, सेवकाचे कार्य जाधव विवेक उद्धव व नकुलवाड अभिषेक रामराव या सर्वांनी चांगले काम पाहिले. यांना मार्गदर्शन श्री कांबळे एम.एस.,श्री इंचुरे टी.एन.,श्री मुळे के.के.श्री राहूल घोणसे,श्री डोईफोडे एस.जी.तसेच श्री गव्हाणे एच.पी.श्री गोणपाट जी.आर.यांनी कौतुक करून निरोप देण्यात आला.व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या..
Discussion about this post