
उदगीर /कमलाकर मुळे :
मराठा सेवा संघ उदगीरच्या वतीने छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उदगीरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विवेक सुकणे यांनी दिली.
येथील नगरपरिषद व्यापारी संकुलासमोर मंगळवारी दि.(१८)सायंकाळी प्रा.डाॅ.क्रांती विठ्ठलराव मोरे यांचे हिच जिजाऊ जिने घडविले दोन छञपती,या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.तर गुरुवारी दि(.20) सायंकाळी जेष्ठ पञकार ज्ञानेश महाराव यांचे शाहीराचे छञपती शिवराय,या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.तसेच बुधवारी दि.(१९),सकाळी.१०ते दपारी २ या वेळेत शहरातील दुधिया हनुमान मंदिरात रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.शिबीराचे उद्घाटन आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते होईल.
या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष प्रा.विवेक सुकणे,प्रदिप ढगे,राजकुमार कानवटे,संदिप जाधव,संदिप नाईक,प्रा.भास्कर मोरे,गणपत गादगे,राजकुमार माने, कमलाकर मुळे,अनिता जाधव,पुष्पाताई जाधव,प्रतिभा मुळे,अनिता जगताप,विवेक होळसमरे आदीनी केले आहे..
Discussion about this post