
उदगीर /कमलाकर मुळे :
दिनांक 19 फेब्रुवारी 2025 वार बुधवार ठीक सकाळी दहा वाजता विद्यालयात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री सय्यद सर होते प्रथमता छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील गान कोकिळा शिक्षिका सौ तांबरे मॅडम यांनी शिवजन्माचा पोवाडा गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर भाषण स्पर्धेला सुरुवात झाली. पहिली ते चौथीपर्यंतच्या चिमुकल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म कार्याबद्दल आपल्या भाषणातून विचार व्यक्त केले. तर पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण सामाजिक राजकीय कार्य. यावर आपले विचार व्यक्त केले.या सर्व विद्यार्थ्यापैकी पहिली ते चौथीतील तीन विद्यार्थ्यांना लेखन पॅड बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. तर पाचवी ते दहावीपर्यंतच्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना लेखन पॅड देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री सय्यद सर यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मोमीन सर यांनी केले तर आभार श्री घटकार सरांनी मांडले. विद्यार्थ्यांना केळी वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.धन्यवाद..
Discussion about this post