
हाडाखेड ता. शिरपूर जि. धुळे महागाईचा मार ट्रक चालकांवर पडत असून अधिकारी मात्र गब्बर शेर होत आहेत. सध्या माणसाच्या हाताला काम गवसत नाही. जेमतेम आपला उदरनिर्वाह व्हावा या हेतूने तो घराबाहेर आपल्या जीवाची बाजी लावून काम करीत आहे. दुसरीकडे परिवहन अधिकाऱ्यांच्या अवैध वसुलीमुळे ट्रकचालक व मालक या गोरख धंद्याला आर्थिक दृष्ट्या त्रासले आहेत. त्यामुळे ह्या चेक पोस्ट ची आर्थिक चौकशी करावी अशी ट्रक चालक व मालक यांची मागणी आहे यासाठी वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसतात. यासाठी प्रशासकीय इमारतीत चक्क खाजगी दलाल आणि आरटीओ यांच्या संगम मताने इमारतीच्या दरवाजा खिडक्या मागे उभे राहून एक दलाल विना पावती अवैधरित्या वसुली घेतली जात असल्याचा आरोप वाहन चालक करीत आहेत. विशेष म्हणजे नेमकी ह्या मार्गाने वाहतूक टोकनरुपी पास दिल्याची धक्कादायक माहिती वाहन चालक देतात. हाच प्रकार व अशाच प्रकार नवापूर गव्हाली येथे चेक पोस्टवरही आढळला आहे असे वाहनचालक सांगतात अशा रीतीने दररोज सुरू असून वाहन चालकांना व मालकांना फुकट आर्थिक भुर्दंड भरावा लागतो आहे. यामुळे शासनाकडे ही अवैध वसुली बंद करण्याची मागणी वाहनचालक व मालक करीत आहेत तो दरवाजा म्हणजे कुबेरचेद्वार महाराष्ट्राची बदनामी कागदपत्र बरोबर असले तरी तपासणीची एक खास शैली आहे वाहन थांबवले जाते आरटीओ (चेक पोस्ट ) कायद्याचा धाक, सरकारी कामात व्यत्य नाहीतर पोलीस गाडी मागून अशी धमकी दिली जात आहे. ह्याच नव्हे तर नवापूर, गव्हाली इतर चेक पोस्टवरही नियमांना धाब्यावर बसवले जात आहे महाराष्ट्रात प्रवेश केल्याची करायची पूर्तता केल्यानंतर ही असे गोरख धंदे चेक पोस्टवर चालू आहे..
Discussion about this post