प्रतिनिधी:- शंभोनाथ रणक्षेत्रे
शहीद सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा यासाठी मुंबई मंत्रालयावर सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांचे व संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने 3 मार्च 2025 रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. जोपर्यंत शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा त्यानंतर चौकशी करत राहावी अशी ठाम भूमिका घेऊन सर्व भीमसैनिकांच्या वतीने न्याय मिळविण्यासाठी आरपारची लढाई लढण्यासाठी हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
निरपराध भीमसैनिकांवर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून त्यांना बेदम मारहाण करत जखमी केले तसेच महिलांना सुद्धा खूप मारहाण करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, ते गुन्हे मागे तात्काळ घ्यावे तसेच जखमी आंदोलकांना आर्थिक मदत द्यावी आणि सूर्यवंशी व वाकोडे कुटुंबीयांना एक कोटीची आर्थिक मदत करत त्यांच्या परिवारातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे तसेच सविधान प्रतिकृती विटंबना करणाऱ्या आरोपी सोपान पवार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याची नार्को टेस्ट करावी यासह इतरही मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याची भूमिका मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडली.

Discussion about this post