प्रतिनिधी:- शंभोनाथ रणक्षेत्रे
परभणी जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक व व्यापार संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाच्या सचिवांच्या सहकार्याने अशा योजनांबाबत विकास आराखडा/व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या बाबत तथा सर्वसामान्य जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये मोठ्या प्रमाणात उणिवा भासत असल्याने अशा उनिवांचा शोध घेऊन त्या विषयाशी संबंधित विभाग प्रमुखांशी सचिवांशी विचार विनिमय करून आवश्यक उपाययोजना करण्याचे निवेदन परभणी जिल्ह्याचे पालक सचिव यांना देण्यात आले.
परभणी शहरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली असून बाबत काही रस्ते हे मागच्या दहा ते पंधरा वर्षांपासून देखभाल दुरुस्ती नूतनीकरण न करता जैसे थे स्थितीत असल्याने मोठी रहदारी आलेल्या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून त्यातून धुळकणामुळे नागरिकांना श्वासनाचे आजार उद्भवत आहेत.बाबत अनेक वर्षांपासून परभणी जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करून ही मोठ्या प्रमाणावर नागरिकांची सातत्याने मागणी असून अंतर्गत रस्त्यांच्या बाबत जिल्हा प्रशासन दखल घेत नाहीये.परभणी जिल्ह्याचे पालक सचिवांनी सर्व मुद्दे काळजीपूर्वक समजून घेऊन निवेदन स्वीकारले.
Discussion about this post