
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे..
मानोरा : मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र कोंडोली येथे सालाबादा प्रमाणे यावर्षी गुरु शिष्य भेट सोहळ्या निमित्य श्री पितांबर महाराज गुरु श्री गजानन महाराज संस्थान तर्फे शिव महापुराण कथा , नाम सप्ताह व भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन दि २० फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ ,प्रवचन ,भजन कीर्तन ,गायन, अभिषेक महाप्रसाद, शोभायात्रा श्री चा पालखी दिंडी सोहळा असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .त्यामध्ये रोज श्री ची काकड आरती सकाळी ५ वाजता श्री चा अभिषेक आरती सकाळी ७ ते ९ श्री शिव महापुराण कथा १ते ४ हरिपाठ सायंकाळी ५:३०ते ७:३०, श्रीहरी कीर्तन ८:३० ते १०:३०होणार असून रोज गुरुवार दि.२०/०२/२०२५ ला सकाळी ७.०० वा. कलश स्थापना व अखंड नाम सप्ताह प्रारंभ, दु.१२.०० वा. सद्गुरु श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्सव संपन्न होईल व दुपारी १.०० ते ४.०० श्री शिवमहापुराण कथा प्रारंभ,
कथा प्रवक्ता ह.भ.प. राधाताई बबन महाराज देव
श्री क्षेत्र कोंडोली ता. मानोरा किर्तन प्रवचनादी कार्यक्रम
गुरुवार दि.२०/०२/२०२५भागवताचार्य ह.भ.प.श्री पुरुषोत्तम महाराज आळंदीकर, यांचे हरिकिर्तन होईल.रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत शुक्रवार दि. २१/०२/२०२५गायनाचार्य ह.भ.प.श्री पुंडलिकजी महाराज मलकापुर, यांचे हरिकिर्तन होईल.रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत शनिवार दि. २२/०२/२०२५भागवताचार्य ह.भ.प.श्री हरिओम महाराज शास्त्री अमरावती, यांचे हरिकिर्तन होईल.रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत रविवार दि. २३/०२/२०२५विनोदाचार्य
ह.भ.प.श्री अरुण महाराज लांडे पारस, यांचे हरिकिर्तन होईल.रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत भागवताचार्य सोमवार दि. २४/०२/२०२५ ह.भ.प.श्री निवृत्ती महाराज शेगांव, यांचे हरिकिर्तन होईल.रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत मंगळवार दि. २५/०२/२०२५ ह.भ.प.श्री परेश श्रीकृष्ण महाराज देव श्री क्षेत्र कोंडोली, यांचे हरिकिर्तन होईल.रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत बुधवार दि. २६/०२/२०२५ श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सांगता, ग्रंथ पुजन सायं. ५.०० वा.व श्रींचा अभिषेक सायं. ७.०० वाजता विनोदाचार्य ह.भ.प.श्री नारायण महाराज पडोळे यांचे हरिकिर्तन होईल.रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत गुरुवार दि. २७/०२/२०२५भागवताचार्य ह.भ.प.श्री बबन महाराज देव श्री क्षेत्र कोंडोली, यांचे काल्याचे किर्तन सकाळी १० ते १२ व महाप्रसाद दु. १ ते ५ पर्यंत शुक्रवार दि. २८/०२/२०२५ दहीहांडी श्रींची पालखी दिंडी सोहळा, रथ, अश्व, रजत मुखवट्यासह श्रींची शोभा यात्रा व नगर परिक्रमा होईल सकाळी १० ते ५ पर्यंत तरी सर्व भाविक भक्तांनी सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन श्री पितांबर महाराज गुरु श्री गजानन महाराज संस्थान विश्वस्त मंडळ श्री चे सेवाधारी मंडळ व समस्त गावकरी मंडळी श्रीक्षेत्र कोडोली यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले..
Discussion about this post