प्रतिनिधी:- संतोष काटे
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर येथील शालेय समिती अध्यक्ष मनीषा ताई शिंदे शालेय समिती सदस्य माधुरी पैठणकर , कविता काटे शाळेच्या मीटिंग संदर्भात गेले असता त्यांच्या अचानक असे लक्षात आले की मुलांना पोषण आहार व्यवस्थित व पूर्णपणे मिळत नाही त्यामुळे त्यांनी मुख्याध्यापकांना पोषण आहार किती शिल्लक आहे व त्याचा स्टॉक मेंटेन कोण करत सर्व विचारपूस केली त्यानंतर त्यांनी पोषण आहार स्टॉक पहाणी केली तेव्हा अचानक खालील प्रमाणे स्टॉक शिल्लक दिसला तेल 26 किलो ,जिरे 10 पॅकेट ,हळद 02 पॅकेट, वटाणा 105 किलो ,तूर डाळ 05 किलो ,मटकी 30 किलो ,चवळी 30 किलो, मुगडाळ 55 किलो, मसूर डाळ 40 किलो,कांदालसूण मसाला 11 किलो ,तांदूळ 07 कट्टा, मोहरी 07 पॅकेट ,मीट 10 किलो, हा सर्व माल शिल्लक कशामुळे राहिला याचा हिशोब मागितल्यानंतर मुख्याध्यापक विलास शिंदे शालेय समिती अध्यक्ष यांना सांगतो तुम्ही सोमवारी आज माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा लेखी नाही लेखी ठेवणारे सर बाहेर गेले आहे तुम्ही नंतर या हिशोब देतो तसेच तुम्ही कोणत्याही अधिकारी यांना सांगितले तरी मला काही फरक पडणार नाही अशा भाषेत अध्यक्षांशी बोलत होता यावर शासनाने लवकरात लवकर लक्ष घालून हा प्रकार थांबवा अशी मागणी.
Discussion about this post