आज सकाळी सात च्या दरम्यान सांगली मधील १०० फुटी रस्त्यावर असलेल्या दुभाजकांमध्ये महापालिकेतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला नागरिकांच्या सहभागातून हा विशेष कार्यक्रम पार पडला विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग नोंदवला. आयुक्त शुभम गुप्ता(IAS) आणि माजी मंत्री आ. डॉ सुरेश खाडे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत शपथ घेण्यात आली. माझी वसुंधरा चे ब्रँड अँबेसिडर दीपक चव्हाण यांनी शपथेचे वाचन केले उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन केले. या वेळी अति. आयुक्त रविकांत अडसूळ ,शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण , कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे , नगर अभियंता परशुराम हळकुंडे ,मालमता अधीक्षक धनंजय हर्षद ,सुनील पाटील , डॉ घाडगे ,सहा आयुक्त नकुल जकाते, सचिन सांगावकर ,पर्यावरण अभियंता अजीत गुजराती, विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी , महापालिका क्षेत्रामध्ये 18 ठिकाणी विविध संघटनेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये सेवा सदन हॉस्पिटल , क्रीडाई सांगली ,वालचंद कॉलेज, निर्धार फाउंडेशन इत्यादी संघटनेच्या पदाधिकारी, विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे , आजच्या कार्यक्रमासाठी वास्तुविशारद प्रमोद चौगुले क्रिडाई चे अध्यक्ष जयराज सगरे यांनी विशेष सहकार्य केले आहे.
Discussion about this post