

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पी पी टी द्वारे साधला लाभार्थ्या सोबत संवाद ; आमदार सत्तार यांच्या हस्ते दहा घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप..
सोयगाव,
ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या वतीने आयोजित पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन वर्ष २०२४-२५ अंतर्गत शनिवारी प्रधानमंत्री आवास योजनेच्या २० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते मंजुरीपत्र तसेच दहा लक्ष लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम संपूर्ण राज्यात एकाच वेळी घेण्यात आला.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना यांच्या कल्पनेतून सोयगाव तालुक्यातील लक्षांक असलेल्या ४०७६ घरकुल लाभार्थ्यापैकी ४४०९ घरकुल मंजू आहेत. त्यापैकी २३०१ मंजूर लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व प्रथम हप्ता पंधरा हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा.करण्यात आले.सोयगाव येथील बचत भवन सभागृहात शनिवारी दुपारी घेण्यात आलेल्या भरगच्च कार्यक्रमात तालुक्यातील दहा घरकुल लाभार्थ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शनिवारी (दी.२२) घरकुल मंजुरी पत्र वितरीत करण्यात आले.
यावेळी मंचावर प्रभाकर काळे, अक्षय काळे, राजेंद्र ठोंबरे, प्रशांत क्षीरसागर, संतोष बोडखे, राजू दूतोंडे, बंडू काळे, उस्मान भाई, तसेच गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव, नायब तहसीलदार संभाजी देशमुख, तालुका गटशिक्षणाधिकारी आर आर आढाव, एकात्मिक बाल प्रकल्प विकास अधिकारी सविता सैवर,घरकुल बांधकाम अभियंता विजय काटकर व विस्तारधिकारी दौड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सोयगाव तालुक्यातील लाभार्थी संतोष गोविंदा मोरे, एकनाथ गोपाल फरकाडे,चिंदाबाई हरी नागपुरे, बापू अर्जुन फुसे, सुमित्राबाई श्रीराम चव्हाण, मंगेश बिऱ्हारे,समाधान दांडगे, सुभद्राबाई लक्ष्मण आरक, सांडू बागुल, सुरेश बोराडे व शारदाबाई संभाजी सोनवणे यांच्यासह तालुक्यातील बचत गटातील महिला पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
फोटो ओळ : – सोयगाव – १) बचत भुवन येथील कार्यक्रमांत मंचावर उपस्थित मान्यवर,
२) घरकुल लाभार्थ्यांना मंजूरपत्र देताना नायब तहसीलदार संभाजी देशमुख
३) उपस्थीत बचत गटाच्या महिला व लाभार्थी..
Discussion about this post