


शालेय जीवन काय असते ते कालच्या मेळाव्यामध्ये बघायला भेटले 40 ते 45 विद्यार्थी काल एकत्र जमले असता सर्वांच्या विचारांची देवाण-घेवाण झाली. सर्व जुने शिक्षक मित्र मैत्रिणी एकत्र आले असता काहींच्या डोळ्यांमध्ये आनंद अश्रू आले. 24 ते 25 वर्षानंतर एकत्र आलेले बघून जो आनंद झाला तो वेगळाच होता. कोणी ऑफिसर कोणी मोठा धंद्यावर कोणी शेतकरी खरोखर ती भेट खूप अनमोल होती. काही विद्यार्थी तर पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदाच भेटत होते त्यामुळे तो क्षण बघण्यासारखा होता. विद्यार्थ्यांनी थोडे थोडे पैसे करून श्रीराम विद्यालय रायपुर शाळेला भजनाचे साहित्य घेऊन दिले.शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना मिस्टान्न
भोजनाची व्यवस्था केली होती.
सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करण्याचा मानस संजय जाधव यांनी हैदराबाद येथे जॉब करता करता सर्व मुलांचे फोन कॉन्टॅक्ट घेऊन एक ग्रुप तयार केला.व ग्रुप वर माहिती देऊन या कार्यक्रमाचे कोणी मुंबई कोणी हैदराबाद काही गुजरात नाशिक काही फौजी ड्युटी वरून आले. सर्वांचा सत्कार करण्यात आला. असे कार्यक्रम अजून पण दुसऱ्या शाळेत व्हायला पाहिजे…
Discussion about this post