



यावेळी आयोजित करण्यात आलेल्या चर्मकार समाजाच्या मेळाव्याचे अध्यक्ष मा किसनराव वानखेडे आमदार उमरखेड, उद्घाटक मा किरणराव सरनाईक आमदार वाशिम प्रमुख पाहुणे म्हणून मा विश्वनाथ घुगे उपजिल्हाधिकारी मा राऊत साहेब विभागीय व्यवस्थाक लिडकॉम होते. यावेळी राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण म्हणून पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने मा किसनराव वानखेडे आमदार मा लक्ष्मण दादा घुमरे बुलढाणा मा चंद्रप्रकाश देगलूरकर नांदेड मा मीराताई शिंदे अहिल्यानगर मा व्यंकटराव दुधंबे नांदेड मा वसंतराव धाडवे वाशिम यांनी केलेल्या सामाजिक कार्यांचा गौरव म्हणून त्यांना सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ सन्मा.आमदार व मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नावर, अडीअडचणीवर सामाजिक दृष्टिकोनातून होणाऱ्या अन्याय बाबत, समाजाच्या सर्वांगीण विकासाबाबत, सविस्तर असे प्रबोधन करण्यात आले. लिडकॉम् योजनेबाबतही चर्चा झाली. संत रविदास महाराज व राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर व्याख्यात्याने व मान्यवरांनी आपापल्या मतांची मांडणी केली. यावेळी मेळाव्याचे अध्यक्ष मा किसनराव वानखेडे आमदार उद्घाटक मा किरणराव सरनाईक आमदार मा नितीन भुतडा मा राजूभाऊ चौधरी व्याख्याते व सत्कारमूर्ती मा चंद्रप्रकाश देगलूरकर मा लक्ष्मण दादा घुमरे मा मीराताई शिंदे मा व्यंकटराव दुधंबे मा वसंतराव धाडवे यांनी अत्यंत प्रभाविपने सगळ्या विषयावर आपली मते मांडली.
अत्यंत चांगला, प्रभावी व यशस्वी झालेल्या या मेळाव्याचे प्रास्ताविक मा गजानन गायकवाड यांनी केले. या मेळाव्याचे संचालन मा गजानन मुडे सर परभणी व आभार मा बळवंत वानरे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी संघटनेचे पदाधिकारी मा संजय राजगुरू मा प्रा वामनराव खंडारे इंजी. विजय धुमाळे मा नामदेव सरदार मा रंजीत मालखेडे मा सौ धाडवे ताई मा नारायण करंगे मा शंकर गायकवाड मा किशोर वाघमारे मा विठ्ठल राजगुरू मा प्रशांत राजगुरू मा संतोष राजगुरू मा अमोल गोडवे मा खुशाल इंगोले व डॉक्टर प्रवीण धाडवे यांनी विशेष परिश्रम घेतलेले आहे..
Discussion about this post