
पेठ वडगाव / प्रतिनिधी :
येथील अभिनंदन ऊर्फ बबलू शिवाजीराव सालपे यांचे शनिवारी निधन झाले. आज मंत्री हसन मुश्रीफ ,खा. धैर्यशील माने ,आ. अमल महाडिक,माजी खासदार राजू शेट्टी, भाजपा चे नेते संजय पाटील , सांगली जिल्हा सेना प्रमुख अभिजीत पाटील , माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ, यांच्यासह विविध नेत्यांनी प्रविता सालपे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी युवक क्रांती आघाडीतील तरुणांचा संघटक हरपल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.
युवक क्रांती आघाडी च्या नेत्या प्रविता सालपे यांचे ज्येष्ठ चिरंजीव असलेल्या अभिनंदन सालपे यांना बुधवारी पहाटे मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अभिनंदन यांची मृत्यूची झुंज व्यर्थ ठरली. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे शहर व परिसरात पसरल्याने त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. माजी खासदार निवेदिता माने ,आमदार अशोकराव माने, वारणा दूध संघाचे संचालक प्रदीप देशमुख ,महेंद्र शिंदे, डॉ. मिलिंद हिरवे, राजवर्धन मोहिते, अरुण पाटील,विकास माने यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. शहरातील एसटी स्टँड चौक, पद्मा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर रोड या प्रमुख मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली . यावेळी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंत्ययात्रेवेळी वृद्ध महिलांनी केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता.रात्री उशिरा कोल्हापूर रोडवरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोशल मीडिया वरून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रसारित झालेले व्हिडिओ व पोस्ट यामुळे शहरात भावनिक लाट निर्माण झाली होती.
दिवसभर वडगाव परिसरातील विविध नेत्यांनी व वडगाववासीयांनी सालपे कुटुंबीयांचे सांत्वन केले..
Discussion about this post