
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे..
मानोरा :
तालुक्यातील शेंदुरजना (आढाव) या गावामधील मुलाचे संशयास्पद झालेल्या मृत्यू प्रकरणी तीन वर्षीय मयत मुलाच्या आईकडून मानोरा पोलीस स्टेशनला पती, सासू-सासरे आणि भासऱ्या निरोधात गुन्हेगारी कट रचून मुलाची हत्या केल्याचे तक्रार निवेदन देऊन गैर अर्जदारांवर कायदेशीर कारवाईची मागणी पिडीत महिला किरण अमोल चव्हाण यांनी केली आहे.
महिलेची ठाणेदार याजकडे तक्रार
घातपाताचा बनाव करणाऱ्यांवर कारवाईची मातेची मागणी.
तालुक्यातील शेंदुरजना (आढाव) येथे सासर असलेल्या व हल्ली मंगरूळनाथ येथे राहायला असलेल्या किरण कोमल चव्हाण या महिलेचे लग्न शेंदुरजना आढाव येथील कोमल जगदीश चव्हाण यांचे सोबत झाले असून कोमल या एसटी महामंडळामध्ये वाहक म्हणून नोकरीला आहेत. किरन चव्हाण यांचे पती व्यसनी असून ते तक्रारकर्ता महिलेला शारीरिक, मानसिक त्रास देतात तथा वडिलांकडून तीन लक्ष रुपये घेऊन ये असे तगादा लावत असल्यामुळे पती कोमल याच्या विरोधात आसेगाव पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविलेली आहे. या रागातून पती व त्यांच्या कुटुंबीयांनी गुन्हेगारी कट रचून चिमुकल्या तीन वर्षाच्या पार्थ चव्हाण या मुलाला क्रूरपणे आयुष्यातून उठवल्याचे किरन चव्हाण यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
घातपाताचा बनाव करणाऱ्यांवर कारवाईची मातेची मागणी
तक्रारकर्ता महिलेचे वडील निधन पावल्याने सांत्वनासाठी आलेले कोमल चव्हाण, भाऊ अमोल जगदीश चव्हाण व त्याचे वडील जगदीश सिताराम चव्हाण हे १५ फेब्रुवारी रोजी मंगरूळनाथला आले असता त्यांनी या संधीचा लाभ घेऊन चिमुकला पार्थ याला हिसकावून नेल्याचे आसेगाव पोलीस स्टेशनला याआधी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पती कोमल आणि याच कुटुंबातील अन्य आरोपींच्या विरोधात न्यायालयात सुद्धा तक्रारकर्ता महिले कडून फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. या बाबीची माहिती झाल्यावर गैर अर्जदारांनी हेतूतः त्यांच्या ताब्यातील मुलाचा क्रूरपणे खून करून अपघाताचा बनाव केल्याचा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
पती कोमल, पतीचा मोठा भाऊ अमोल चव्हाण, सासरा जगदीश चव्हाण आणि सासू इंदुबाई जगदीश चव्हाण हया निर्दयी गैर अर्जदारांवर कायदेशीर कारवाई करून न्याय देण्याची तक्रारकर्त्या मयत चिमुकल्याची आई किरन चव्हाण यांनी केली आहे..
Discussion about this post