प्रा. दिलीप नाईकवाड सिंदखेडराजा/तालुका प्रतिनिधी ================
त्र्यंबकेश्वर : महाशिवरात्री निमित्ताने पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वर येथे महादेवाचे दर्शन घ्यायला महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील विविध राज्यांतील भाविक दर्शनाला येत असतात. त्यामुळे भाविकांसाठी ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वर मंदिर अहोरात्र २४ तास खुले राहणार आहे. बुधवार गुरुवार धरून ४८ तास मंदिर खुले राहील. महाशिवरात्री दिनी होणारी शिवभक्तांची गर्दी लक्षात घेता देणगी दर्शन रुपये २०० माणसी ऑनलाइन सुविधा दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच २६ व २७ हे दोन दिवस व्हीआयपी दर्शन बंद आहे तसे गर्भगृहदर्शनाला परवानगी देण्यात आललो नाही.
महाशिवरात्रीच्या दिवशी २६ रोजी मंदिर पहाटे ४ वाजता मंदिर उघडेल. त्र्यंबकेश्वराची पालखी दुपारी 3 वाजता त्र्यंबकेश्वर मंदिरातून निघेल. पालखी त्र्यंबकेश्वराची सोन्याची मूर्ती असते . या मूर्तीला कुशावर्त तीर्थावर जलाभिषेक घालण्यात येईल. पालखी त्र्यंबकेश्वर मंदिरात परतेल. यंदाच्या सर्वाध्ये मिरवणुकीत शिवतांडव नृत्याचे देखील नियोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीला त्रंबकेश्वर मंदिरात मध्यरात्री भगवान त्रंबकेश्वराची महापूजा करण्यात येईल यावेळी देखील मंदिरांतर्गत पालखी निघेल. सवाद्य पालखी मोठा उत्सव असतो.
महिला भाविक त्र्यंबकेश्वर मंदिरात सायंकाळी महाशिवरात्र वाती मंदिरा आवारात प्रज्वलित करतात . मंदिरात रांगेत असणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणावर सुविधा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान देते. देवस्थानचे अध्यक्ष न्यायाधीश नितीन जीवने यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे सर्व विश्वस्त व अधिकारी वर्ग उत्सवाचे नियोजन करीत आहे. एस टी महामंडळाकडून ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहे. त्रंबकेश्वर नगरपालिकेकडून स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. तर वाढू ज्यादा पोलीस बंदोबस्त त्र्यंबकेश्वर पोलीस यंत्रणे कडून ठेवण्यात येणार आहे. महाशिवरात्रीला अभिषेक करणे उसाचा रस आंब्याचा मोहर बेल शंकराच्या पिंडीवर वाहणे भगवान शिवाची पोथी वाचणे दिवसभर उपास करणे असे व्रत भाविक करतात. पार्वती मातेने महाशिवरात्रीचे व्रत केले.
महाशिवरात्रीला शिवपार्वतीचा विवाह झाला अशी आख्यायिका आहे.त्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची धारणा आहे. दरम्यान त्रंबकेश्वर देवस्थाने कायमस्वरूपी भाविकांसाठी अल्प दरात अथवा मोफत महाप्रसादाचे सुविधा करावी अशी जुनी मागणी भाविकांनी पुन्हा केली आहे. महाप्रसाद सुविधा देण्याची मागणी वाढत आहे महाशिवरात्री निमित्त ट्रस्टची जय्यत तयारी
दरम्यान, महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार इत्यादी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येणार आहे. महाशिवरात्री उत्सवानिमित्त ट्रस्टतर्फे त्तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोमवारी (दि.24) मेहंदी तसेच मंगळवारी (दि. 25) हळदीचा समारंभ होणार आहे. सायंकाळी बासरी वादन कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (दि.26) दुपारी श्री त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातून निघेल. पारंपरिक मार्गानुसार तिर्थराज कुशावर्त येथे षोडशोपचार पुजा करुन संध्याकाळी पालखी पारंपरिक मार्गाने पुन्हा देवस्थानमध्ये येणार आहे. पालखी दरम्यान शिव तांडव ग्रुपतर्फे अघोर नृत्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सायंकाळी नटरंग अकॅडमी पुणे प्रस्तुत शिवार्पणमस्तू नृत्य कार्यक्रमाची प्रस्तुती अभिनेत्री प्राजक्ता माळी व सहकलाकार सादर करणार आहेत. ट्रस्टतर्फे बुधवारी (दि. 26) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी करण्यात येणार आहे. विशेष महापूजा व पालखी सोहळा रात्री होणार आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टने दिली आहे. दरम्यान त्रंबकेश्वर मंदिरात तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष न्यायाधीश नितीन जीवने, सचिव श्रीया देवचके, विश्वस्त रुपाली भुतडा, कैलास घुले ,मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माचवे यांनी दिली आहे ..
Discussion about this post