




रवींद्र पवार,
तालुका प्रतिनिधी शिरूर..
पुणे विभागाच्या अप्पर कामगार आयुक्तपदी अभय गीते यांची नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघ चे पदाधिकारी आणि पत्रकार यांच्यातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.
अभिजीत गीते हे मूळचे बीड चे आहेत. बीड येथे त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण आणि औरंगाबाद येथे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर गीते साहेब यांनी बी फार्मसी केली आणि त्यानंतर मराठवाडा विद्यापीठातून एमबीए (Human Resource) चा अभ्यासक्रम पूर्ण केला.त्यानंतर आठ वर्षे औद्योगिक क्षेत्रामध्ये मनुष्यबळ विकास विभागाचे काम पाहिले आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून प्रथम औरंगाबाद व पुणे तसेच पुणे कामगार उप आयुक्त पदी कार्यरत असताना त्यांची पुणे विभागाच्या अप्पर कामगार आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली.
त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक संघाचे संस्थापक अध्यक्ष व सणसवाडी गावचे उपसरपंच राजू अण्णा दरेकर , ज्ञानेश्वर भाऊ जाधव, संघटनेचे सचिव रवीदादा पवार ,कोषाध्यक्ष विकास बापू दरेकर ,पत्रकार तात्याराव मोरे इत्यादी उपस्थित होते..
Discussion about this post