


रवींद्र पवार,
तालुका प्रतिनिधी शिरूर..
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी
या विद्यालयात प्रथमच दहावी परीक्षेचे केंद्र मिळाल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यात एक उत्साहाचे वातावरण होते.
ग्रामपंचायत सणसवाडीसरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य तसेच श्री नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळयांच्या संयुक्त विद्यमाने
विद्यार्थ्यांना परीक्षा देताना कुठलाही प्रकारचा ताणतणाव येऊ नये, भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीने म्हणजे रांगोळ्यांच्या पायघड्या, फुग्यांची आरास व गुलाबपुष्प देत अतिशय उत्साहात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करत विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.
सकाळच्या प्रसन्न वातावरणात आणि अनोख्या पद्धतीने सजवलेल्या शाळेचे रूप पाहून इयत्ता 5 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या 10 वी च्या मोठ्या भावंडांना टाळ्यांच्या गजरात मोठ्या उत्साहाने आणि जोशात शुभेच्छा दिल्या, त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह खरोखर विलोभनीय होता. विद्यार्थ्यांबरोबरच सर्व शिक्षकांचेही गुलाब पुष्प देऊन स्वागत केल्याने त्यांच्या कृतीला उत्तेजन, उत्साह आणि प्रोत्साहन मिळाल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
केंद्र संचालक श्री. ढवळे आर.बी. उपकेंद्र संचालक सौ. मेंगवडे मॅडम यांनी परीक्षा आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडावी यासाठी परीक्षा केंद्राचे उत्कृष्ट नियोजन केले आहे.
API सौ. रोहिणी सोनावले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियान व परीक्षेत होणारे गैरप्रकार व त्याचे परिणाम या संबंधी माहिती देऊन शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष श्री आनंदराव हरगुडे यांनी भावी जीवनात दहावीच्या परीक्षेतील यशाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. कोणत्याही गोष्टीतील प्राविण्य हे काही नशिबाने मिळत नसतं; तर भरपूर कष्ट आणि सराव यातून ते मिळतं, कठोर परिश्रम आणि अखंड सराव यामुळे माणसाच्या कामात सफाईदारपणा येतो. हे सांगून परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या.
उपसरपंच राजेंद्र सुदामराव दरेकर
यांनी
ध्येयामुळे आयुष्याला अर्थ प्राप्त होतो. येथूनच यशाला सुरुवात होते. यशाचं गौरीशंकर गाठण्याचे ध्येय समोर ठेवा. त्याच्या जवळपास जरी पोहोचू शकलात तरी तुमच्या आयुष्याचं सार्थक होईल. असा यशाचा कानमंत्र देत शुभेच्छा दिल्या.
परीक्षा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी व परीक्षार्थींना शुभेच्छा देण्यासाठी
संस्थेचे अध्यक्ष श्री. आनंदराव हरगुडे, सचिव श्री. बाबासाहेब साठे व सर्व पदाधिकारी, शिक्रापूर पोलीस स्टेशन API सौ.रोहिणी सोनावले मॅडम
केंद्र संचालक श्री. ढवळे आर.बी
मुख्याध्यापिका सौ मेंगवडे मॅडम.ग्रामपंचायत सणसवाडी सरपंच सौ. रूपालीताई दगडूनाना दरेकर,
उपसरपंच श्री.राजेंद्र सुदामराव दरेकर,सर्व ग्रामपंचायत सदस्य,
शाळा व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक संघ सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या..
Discussion about this post