

उमरी तालुक्यातील रामखडक गावात जल जीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली घरगुती नळजोडणी योजना व टाकीचे काम पुर्ण होऊन सुद्धा पाण्यासाठी करावा लागतो संघर्ष. ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. एक ते दोन वर्षापासून गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
यासंदर्भात वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारी करूनही कुठलीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त महिलांना विकत पाणी घ्याव लागत आहे. आणि प्रशासन सुद्धा लक्ष द्यायला तयार नाही . जल जिवन मिशन म्हणजे पैशांची खिरापत वाटपासारखे
गेल्या दोन-अडीच वर्षापासून महिलांना पाणीटंचाईमुळे विहिरीवर जाऊन पाणी भरावे लागत आहे, मात्र विहिरीतील पाणीही आता आटल्याने परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. ग्रामसेवक व प्रशासकांकडून वारंवार आश्वासने मिळाली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही.
जिल्ह्यातील कामांचे ठेकेदार आर्थिक कोंडीत
त्यामुळे लवकरात लवकर पाणयाची सोय करावी. जलजीवन योजनेच्या अंमलबजावणीबाबत चौकशीची मागणीही करण्यात येत आहे..
Discussion about this post