

प्रा .दिलीप नाईकवाड,
सिंदखेडराजा/तालुका प्रतिनिधी..
बुलढाणा जिल्हा परिषदे च्यावतीने दरवर्षी ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा परिषद यांचे सूचनेनुसार ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अंतर्गत जनता यामध्ये समन्वय साधून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकानां आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात येतो.
सन 2022 -23 व 2023- 24 या वर्षाचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून सिदंखेडराजा तालुक्यातील रामदास रंगनाथ मेहत्रे आणि किशोर किसन जाधव यांना जिल्हास्तरावर मिळणारा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाबराव खरात यांनी जाहीर केला आहे.
आज ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायत मध्ये गाव पुढारी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, व गावातील काही उपद्रवमूल्य करणारे सन्माननीय यांच्या सर्वांच्यां तावडीतून गावाचा विकास करणे ही एक मोठी कसरत आहे.
या सर्व परिस्थितीत गावाचा सर्वांगींण विकास करण्याचा ध्यास घेऊन रामदास मेहत्रे, व किशोर जाधव या ग्रामसेवकांनी उत्कृष्ट कार्य केले. नक्कीच त्यांच्या कार्याचा गौरव होणे आवश्यक होते. व त्यासाठीच निकष लावलेल्या चाचणीतून या दोघांना चांगले काम केल्याबद्दल आदर्श ग्रामसेवक म्हणून त्यांची निवड करून त्यांना जिल्हा स्तरावरील पुरस्कार जाहीर करण्यात आला.
त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंचायत समिती सिदंखेडराजाचे गटविकास अधिकारी अंकुश मस्के यांच्यासोबत ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक बुरकुल . तालुकाध्यक्ष कैलास झिने , उद्धव गायकवाड, अविनाश नागरे, विनोद सातपुते, यांच्यासह ग्रामसेवक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी किशोर जाधव व रामदास मेहत्रे या दोघांचे कौतुकासह अभिनंदन करून स्वागत केले आहे लवकरच जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या वतीने एका समारंभात हा पुरस्कार दोघांना सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे..
Discussion about this post