शिरूर तालुका प्रतिनिधी:-
पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या हवालदार संजू जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका, स्वारगेट पुणे येथे 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून फरार झालेल्या आरोपी दत्ता गाडेला पकडण्यासाठी पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार संजू जाधव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
गावकऱ्यांच्या सहकार्याने आरोपीला पकडण्यात यश गुनाट गावातील नागरिक आणि स्थानिक तरुण गणेश गव्हाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीला पाहून त्याला शिताफीने पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांची मोठी शोधमोहीम आणि गुनाट गावाचा सहभाग दत्ता गाडे गुनाट गावातच लपल्याची खात्री झाल्यानंतर दोनशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा, ड्रोन आणि श्वान पथकांसह शोधमोहीम राबवण्यात आली.
गावातील तरुण आणि नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करत आरोपीला पकडण्यासाठी विशेष प्रयत्न केले. पोलीस हवालदार संजू जाधव यांच्या चातुर्यामुळे आरोपी समोर आला.
2019 मध्येही आरोपीला अटक केलेल्या संजू जाधव यांनी माईकवरून आवाहन करत दत्ता गाडेला पोलिसांसमोर यायला भाग पाडले.
त्यांच्या आवाजामुळे आरोपीला विश्वास मिळाला आणि तो मैदानाजवळ आला, जिथे गावकऱ्यांनी त्याला पकडले. गुनाट गावावरचा कलंक पुसण्यासाठी गावकऱ्यांचे योगदान या घटनेमुळे गुनाट गाव आणि शिरूर तालुक्याचे नाव बदनाम झाले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करून आरोपीला पकडण्यास मदत केली,हे संपूर्ण गावासाठी महत्त्वाचे ठरले. गावकऱ्यांची जागरूकता आणि पोलिसांच्या मेहनतीमुळे आरोपी अखेर अटकेत.
Discussion about this post