*प्रतिनिधी :अमोल कोलते फुलंब्री. शेतीचा उत्पन्न वाढवावे यासाठी नवनवीन यंत्रानाचा वापर करावा, सुहास शिरसाठ
फुलंब्री शहरात येत्या ६ मार्च ते १० मार्च पर्यंत देवेंद्र कृषी व डेअरी एक्पोचे आयोजन करण्यात आली आहे अशी माहिती काल दिनांक २७ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या व्यासपीठावर जेष्ठ नेते देवराव राऊत, माजी उपनगराध्यक्ष गजानन नागरे, भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ, कैलास सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले की,
शेतकरी यांना नैसर्गिक अंदाज कळावा यासाठी फुलंब्रीत हवामान तज्ञ पंजाबराव डक उपस्थित राहणार आहे, पशु प्रदर्शन पण करण्यात येणार आहे, या प्रमुख कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड , आमदार अनुराधा चव्हाण यांच्या सह आदींची उपस्थिती राहणार आहे.
महायुती सरकारच्या विविध योजना शेतकर्यां पर्यंत पोहचावा यासाठी २०० स्टॉल उपलब्ध असणार, बचत गट मोफत असणार, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित असणार,
जनतेचा प्रतिसाद मिळाला तर दर वर्षी हा कार्यक्रम ठेऊ असे भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी सांगितले,
3 फुट ऊंचीची पुंगनुर गाय असणार, माती परिक्षणाचा कार्यक्रम राहणार, या कार्यक्रमाला
बैठक तालुका सभापती राधाकिसन पठाडे, सोयगाव चे बंटी राठोड,
पत्रकार परिषदेत भाजपा चे किसान मोर्चा चे तुपे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष वाल्मीक जाधव, संतोष जाधव, सुमित प्रधान, सतीश ढंगारे , अजय नागरे, बाबासाहेब शिंगारे, रविंद्र काथार, माजी नगरसेवक गणेश राऊत, संतोष सुरभैये , यांच्या सह आदींची उपस्थिती होती.
Discussion about this post