प्रतिनिधी : अमोल कोलते फुलंब्री .
फुलंब्री तालुकयातील श्री रामेश्वर विद्यालय वाघोळा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भगवान उबाळे सर तर उद्घाटक जि. प. प्रा.शा. वाघोळा शाळेचे मुख्याध्यापक बावस्कर सर उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री कैलास व्यवहारे सर यांनी विद्यार्थ्यांना सी व्ही रमण यांच्या विषयी माहिती दिली. तसेच उद्घाटक श्री बावस्कर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप विद्यालयाचे श्री भगवान उबाळे सर यांनी केले. तसेच या विज्ञान दिनानिमित्त विद्यालयात विज्ञान रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात एकूण 35 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे परीक्षण जि. प. प्रा. शाळेची शिक्षिका जयश्री शिरपुरे व सरिता कापरे यांनी केले.यात इयत्ता 9 वी वर्गातून 2 व इयत्ता 8 वी वर्गातून 2 विद्यार्थ्यांचा क्रमांक नोंदविण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळा वाघोळा विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती नोंदवली. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे गोमटे सर बोंगाणे सर, पंचायत समिती विशेष शिक्षिका श्रीमती आम्रपाली गायकवाड मॅडम व पाटील मॅडम व श्री रामेश्वर विद्यालयाचे श्री चव्हाण सर व गौतम पाखरे उपस्थित होते या उपक्रमात विद्यालयाच्या इयत्ता 8 वी व 9 वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चि. विवेक आत्माराम गायकवाड यांनी केली तर आभार चि. बाबासाहेब संजय बोराडे यांनी मानले.
Discussion about this post